Video : पारंपरिक वारली चित्रकला कॉफी पेंटिंगमध्ये

नीला शर्मा
Thursday, 18 June 2020

चित्रकार प्रियंका जगनगडा ही तरुणी सिरॅमिक व कॉफी आर्टच्या मिलाफातून वारली चित्रं साकारते. चक्क इन्स्टंट कॉफी पावडर वापरून ती वेगळा परिणाम साधते. काही संस्थांच्या आवारातील भिंतींवर तिनं मोठ्या आकारात काढलेली वारली चित्रं आकर्षणाचं केंद्र ठरली आहेत.

चित्रकार प्रियंका जगनगडा ही तरुणी सिरॅमिक व कॉफी आर्टच्या मिलाफातून वारली चित्रं साकारते. चक्क इन्स्टंट कॉफी पावडर वापरून ती वेगळा परिणाम साधते. काही संस्थांच्या आवारातील भिंतींवर तिनं मोठ्या आकारात काढलेली वारली चित्रं आकर्षणाचं केंद्र ठरली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रियंका जगनगडा या चित्रकार तरुणीला वारली चित्रशैलीने मोहून घेतलं. तिनं कॉफी पेंटिगमध्ये वारली शैलीचा संगम घडवत अभिव्यक्तीला निराळंच रूप दिलं. ती म्हणाली, ‘‘चित्रकलेतील पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षी वारली चित्रकला हा विषय होता. संदर्भासाठी फारशी पुस्तकं मिळाली नाहीत. मग यातील व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेत मी जव्हारला गेले. जीव्या सोम्या म्हसे या प्रसिद्ध वारली चित्रकाराकडून बरंच काही जाणून घ्यायची संधी मिळाली. मी प्रकल्पासाठी वारली हा विषय निवडला. त्यांची निसर्गकेंद्रित साधी राहणी, सण, लग्नसमारंभ वगैरेचं प्रतिबिंब त्यांच्या चित्रांमध्ये दिसतं.

कॉफी पेंटिंग हा माझा जिव्हाळ्याचा विषय. त्यात मी वारली चित्रशैली वापरू लागले. या मिलाफातून अनेक चित्रं केली. मी पुण्यात राहते; पण सासवड, पन्हाळा यांसारख्या गावांमध्ये काही सामाजिक संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांच्या आवारातील भिंतीवर मोठ्या आकारात वारली चित्रं काढली. अनाथ मुलांसाठीच्या काही निवासी संस्थांमध्ये तर मी उन्हाळ्याच्या सुटीत निवासी मुलांसाठी वारली पेंटिंगच्या कार्यशाळाही घेतल्या.’’

प्रियंका म्हणाली, विशिष्ट प्रकारच्या बोर्डवर कागद लावून बेस तयार करते. नंतर सिरॅमिक व चिकटवण्यासाठीच्या पदार्थाचं मिश्रण कोनमध्ये भरून रेखाटन करते. या रेखाटनाचा पहिला थर वाळल्यावर पुढचा, असे थरावर थर चढवून उठाव निर्माण करते. आहे. कलावंत असलेले माझे वडील हनुमंत जगनगडा यांचा वारसा पुढे नेत असल्याचा आनंद नवीन चित्रकृती साकारताना मला होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma warli drawing copy painting