आता शेवटचा घाव ‘मिशन झिरो पुणे’

Corona-patient
Corona-patient

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी नव्या रुग्णांची साखळी तोडण्यात यश आले नाही. हे आव्हान पेलण्यासाठी धारावी, मालेगावमध्ये यशस्वी ठरलेला ‘मिशन झिरो’ उपक्रम पुण्यासाठीही वरदायी ठरू शकतो. ज्या मनोभावे पुणेकर गणेशोत्सव साजरा करतात, त्याच तळमळीने अन श्रद्धेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यास गणपतीसोबतच कोरोनाचेही विसर्जन करणे शक्‍य होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या पाच महिन्यांत कोरोनाविरोधातील संघर्षातून आपण अनेक गोष्टी शिकलो. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. मात्र, या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिणाम अद्यापही जाणवत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास यश येत नाही. पण पुण्यापेक्षाही भयंकर परिस्थिती असताना मालेगाव अन मुंबईतील धारावी येथे कोरोनाचे रुग्ण कमी करण्यात यश आले आहे. त्यासाठी ‘मिशन झिरो’ उपक्रम प्रभावी ठरला. पुण्यातही महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेतला आहे. पुणेकरांनी अनेक चळवळी, उपक्रम यशस्वी केले आहेत. त्यामुळे कोरोनाचा पुण्यातून नायनाट करणे अवघड नाही. 

पुण्यात ६३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत, पण ४४ हजार बरेही झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यात यश येत आहे. पण दररोज दीड हजारांची नव्याने भर पडत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी ‘मिशन’च आवश्‍यक आहे. त्यासाठी शेवटचा घाव घालूया ! 

काय आहे ‘मिशन झिरो’?

  • जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या करून रुग्ण शोधणे. 
  • रॅपिड ॲक्‍शन प्लॅन तयार करणे.
  • फिरत्या दवाखान्यांची संख्या वाढविणे. 
  • कोरोना रुग्णांच्या सानिध्यात आलेल्यांची तपासणी करणे.
  • रिपोर्ट लवकर उपलब्ध देणे.
  • पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार.
  •  रूग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागातून ही मोहीम सुरू करणे.
  • नागरिकांनी चाचणी केल्यास रुग्णांची साखळी तोडणे शक्‍य.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com