‘सांडिजे वित्त परी मनी विठ्ठल धरी’

शंकर टेमघरे 
सोमवार, 29 जून 2020

आषाढी वारीतून दरवर्षी लाखो वारकरी पंढरीला जातात. यंदा मात्र या आनंदसोहळ्याला साऱ्यांनाच मुकावे लागले आहे. या सोहळ्यातील उलाढाल शंभर ते सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. अर्थात, हा आकडा नेमका किती, हे त्या पांडुरंगालाच ठाऊक. ‘जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे’ या संत तुकोबांच्या शिकवणुकीनुसार चालणाऱ्या ‘वारीच्या गावा’चे अर्थचक्र यंदा कोरोनामुळे जागीच थांबले. ‘ सांडिजे वित्त परी मनी विठ्ठल धरी’ अशीच ही वेळ असून, यानिमित्ताने वारीतील अर्थकारणाचा घेतलेला आढावा.

आषाढी वारीतून दरवर्षी लाखो वारकरी पंढरीला जातात. यंदा मात्र या आनंदसोहळ्याला साऱ्यांनाच मुकावे लागले आहे. या सोहळ्यातील उलाढाल शंभर ते सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. अर्थात, हा आकडा नेमका किती, हे त्या पांडुरंगालाच ठाऊक. ‘जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे’ या संत तुकोबांच्या शिकवणुकीनुसार चालणाऱ्या ‘वारीच्या गावा’चे अर्थचक्र यंदा कोरोनामुळे जागीच थांबले. ‘ सांडिजे वित्त परी मनी विठ्ठल धरी’ अशीच ही वेळ असून, यानिमित्ताने वारीतील अर्थकारणाचा घेतलेला आढावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वारीतील अर्थचक्राला कोरोनाचे ग्रहण
राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून अनेक संतांच्या पालख्यांसमवेत सुमारे दहा लाख वारकरी आषाढी वारीला जातात. लाखो वारकऱ्यांचे हे ‘वारीचे गाव’ एका गावातून दुसऱ्या गावात वाटचाल करते. तेही तब्बल वीस-बावीस दिवस. ‘वारीच्या गावा’चे अर्थकारण चक्रावणारे आहे. येथे कोट्यवधींची उलाढाली होते. यंदा वारी रद्द झाली आणि हे उलाढालीचे अर्थचक्रही थांबले. नफा मिळविण्याच्या उद्देशाने व्यापारी वारीत येतच नाहीत. विठुरायाच्या भक्तांची सेवा हीच त्यांची वारी.  सलून, लाँड्रीपासून मोबाईल चार्जिंग करून देण्यापर्यंत सारे वारीत उपलब्ध असते. वारकऱ्यांच्या संख्येबरोबर व्यावसायिकांचीही वर्दळ वेगाने वाढत आहे. वारीचा सारा व्यवहार चालतो तो ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या नावावरच! एकवीस दिवस संतांच्या सहवासात राहणारे व्यापारी कधी वारकरी होऊन जातात, हे त्यांनाही समजत नाही. 

Image may contain: text that says "ट्रक- टेंपो टँकर 8R खासगी वाहने २५०० (दररोजचे एक हजार भाडे, दोन हजारांचे डिझेल, चालक पाचशे रुपये) ३५०० भाडे आणि खर्च (रुपयांत) ९०० ३५०० वाहनसंख्या (दररोजचे एक हजार भाडे, दोन हजारांचे डिझेल, चालक पाचशे रुपये) २००० १००० व्यावसायिक वाहने ३०० १०००"

तीन महिने आधीच तयारी
देवस्थान समित्यांकडून अडीच ते तीन महिने अगोदरच वारीचे नियोजन सुरू होते. देवस्थानच्या वतीने रथ, पालखीची डागडुजी, सजावट, तंबूंची डागडुजी, किराणा भरणे, वाहनांची तयारी केली जाते. वारीकाळात मानकरी, सेवेकरी, कर्मचारी; तसेच पोलिस अशा सुमारे चारशे जणांना देवस्थान जेवू घालते. सरकारकडून दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी; तसेच मुक्कामाच्या ठिकाणी अनुदान दिले जाते. त्यातून स्थानिक प्रशासन वारकऱ्यांना सेवासुविधा पुरवते.

No photo description available.

दिंड्यांना भिशीतून उत्पन्न
सोहळ्यात दिंड्या असतात. दिंडीत सहभागी होण्यासाठी वारकऱ्यांकडून विशिष्ट रक्कम घेतली जाते, त्याला भिशी म्हटले जाते. यातून दिंडीचालक वारकऱ्यांची खाण्या-पिण्याची व तंबूत राहण्याची व्यवस्था करतात. एका दिंडीत सरासरी दोनशे ते सात हजार वारकरी असतात. यातील बहुतांश दिंड्या वारीत लागणारा किराणा माल; तसेच अन्य साहित्याची खरेदी पुण्यातच करतात. केवळ भाजीपाल्याची खरेदी त्या-त्या मुक्कामाच्या ठिकाणी करावी लागते.

Image may contain: one or more people

वारीतील वाहने
वारीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे सामान, जेवणाचे साहित्य, तंबू, पाणी हे एका गावातून दुसऱ्या गावात नेण्यासाठी वाहनांची आवश्‍यकता भासते. त्यासाठी ट्रक, टेंपो, टँकर अशी वाहने असतात. वारीत एका दिंडीचा किमान एक ट्रक आणि एक टॅंकर असतोच. आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर अठरा ते वीस दिवसांसाठी ही वाहने दिंडी व्यवस्थापन भाडेतत्त्वावर घेतात.

व्यावसायिक
वारीच्या वाटेने चालताना वारकऱ्याना निरनिराळ्या सेवा देण्यासाठी अनेक व्यावसायिक सहभागी होतात. त्यामध्ये इस्त्रीवाले, सलूनवाले यांचा समावेश असतो. ही सेवा व्यवसाय म्हणून केली जात नाही. त्यामध्ये सेवाभाव असतो. त्यामागे तिहेरी भावना असते.

वारकऱ्यांची सेवा होते, स्वतःचीही वारी पूर्ण होते; तसेच नाममात्र का होईना, उत्पन्नही मिळते. पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी खेळणी विक्री करणारे; तसेच पादुकांवर वाहण्यासाठी पानफूल विक्री करणारे अनेक व्यावसायिक वारकरी असतात.

वारीत खेळणी विक्री करणारे माळशिरस तालुक्‍यातील बहुतांश नंदीवाला; तसेच पारधी समाजाचे लोक असतात. या विक्रेत्यांना दिवसाला किमान ८०० ते १००० रुपये मिळतात. पानफूल विक्री करणाऱ्यांना सहाशे ते सातशे रुपये मिळतात.

गावांची उलाढाल कोटीत 
संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या आगमनाने मुक्कामाच्या गावांत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. प्रातिनिधिक म्हणून वेळापूरमधील उलाढाल काढली, ती सुमारे एक कोटीच्या घरात आहे. त्यामध्ये किराणा दुकान, हॉटेल, अन्य दुकाने, भाजी मंडई, ग्रामपंचायत तयारी, प्रवासी वाहने, पेट्रोल पंप आदी बाबींचा विचार करण्यात आला. त्यानुसार दोन्ही मार्गांवरील सुमारे तीस गावांमध्ये ही उलाढाल कमी- अधिक प्रमाणात होते, त्यातही पुण्यात सर्वाधिक उलाढाल होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shankar Temgire on aashadhi wari