सहा तासांत ७७ किलोमीटर अंतर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पिंपरी - अजमेरा कॉलनी येथील सायकलपटू अरविंद दीक्षित यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी सायकलवरून ६ तासांत ७७ किलोमीटर अंतर पूर्ण केले.
यापूर्वी अमृतमहोत्सवी वर्षी (७५ वर्षे) दीक्षित यांनी पिंपरीतील डॉ. हेडगेवार मैदान येथे साडेपाच तासांत ७५ फेऱ्या धावून पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे या वर्षीचा ७७ वा वाढदिवसही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वी सायकलिंगला सुरवात केली होती. 

दीक्षित म्हणाले, ‘७७ किमीचे अंतर कापण्यासाठी आम्ही साडेसहा किमीचे सर्किट तयार केले होते. त्यावर मी एकूण १२ फेऱ्या मारल्या. अजमेरा कॉलनीतील घरी औक्षण झाल्यावर पहाटे ५.१५ वाजता सायकलिंगला सुरवात झाली. टाटा मोटर्स मुख्य प्रवेशद्वार, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट, सम्राट चौक, अजमेरा कॉलनी या मार्गाचा सर्किटमध्ये अंतर्भाव होता. माझ्यासमवेत, पराग काटदरे (वय ४०), मुक्ता जोशी (वय २२), सचिन चितापुरे (वय ५०), नचिकेत कुंटे (वय २२), प्राची परांजपे (वय ३५) यांचीही सायकलिंग करताना साथ लाभली.’’

सायकलिंग यशस्वीपणे पूर्ण करून घरी परतल्यावर ७७ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. जनार्दन देशपांडे, बी. आर. माडगूळकर, शशी मुळे, अरुण मुळे, सुनील ननावरे आदींचे त्यांना सहकार्य लाभले. दिल्ली विद्यापीठात वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून दीक्षित कार्यरत होते. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी तेथे अनेक सामाजिक कार्यातही हिरिरीने भाग घेतला आहे.

आमच्या लग्नाला ५१ वर्षे झाली. ते कार्यकुशल आणि प्रत्येक कामात तत्पर आहेत. वयोमानानुसार त्यांच्या सायकलिंगच्या निर्णयाबद्दल चिंता वाटत होती. परंतु ते ७७ किमी अंतर पूर्ण करणार याचा विश्‍वास होता.
- वृंदा दीक्षित, पत्नी

Web Title: Arvind Dixti Cycle Player