कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कायापालट - जोशी

नवी पेठ, एस. एम. जोशी फाउंडेशन - ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना अरविंद जोशी.
नवी पेठ, एस. एम. जोशी फाउंडेशन - ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना अरविंद जोशी.

पुणे - ‘एकविसाव्या शतकात कौशल्य आणि नावीन्यपूर्ण संशोधनाला महत्त्व आहे. नवतंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण अनुभवत आहोत. आगामी काळात त्यात आणखी भर पडणार असून, यातून जीवनात आमूलाग्र बदल होणार आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ २०२५ पर्यंत भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनेल,’’ असे प्रतिपादन संशोधक अरविंद जोशी यांनी केले. 

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर जोशी यांचे व्याख्यान झाले, या वेळी ते बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, विनय र र, डॉ. नीलिमा राजूरकर, संजय मा. क., शशी भाटे, डॉ. सुजाता बरगाले, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी उपप्राचार्य विलास तोडकर आदी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेने ५० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, इतका कायापालट करण्याची क्षमता त्यात आहे. परंतु त्यामुळे घाबरून न जाता वस्तुस्थिती समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग होऊ शकतो. थ्रीडी प्रिंटिंगमुळे भविष्यात आमूलाग्र बदल होतील. दुबईमध्ये पोलिस विभागात मानवी चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी होतो. भविष्यात व्यापक स्वरूप घेऊ शकणाऱ्या अल्झायमरसारख्या असाध्य मानसिक रोगावर कृत्रिम बुद्धिमत्ता उपकारक ठरू शकते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com