भिमाले-शिंदे यांच्यातील वाद मिटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाणीच्या मुद्यावरून सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यात निर्माण झालेला वाद मंगळवारी सर्वसाधारण सभेत मिटला. सभागृहात एकमेकांसह पक्षांचा आदर करीत कामकाज करण्याचा शब्द दोघांनी दिला. तसेच, एकमेकांविरोधातील अब्रूनुकसानीचे दावेही मागे घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.  

अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून अतिक्रमण निरीक्षक किशोर पडळ यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भिमाले आणि शिंदे यांनी एकमेकांविरोधात जोरदार आरोप झाले. 

या आरोपांचे पर्यवसान वादात झाले. सभागृहातील चर्चेत बदनामी केल्याचे सांगत, भिमाले यांनी शिंदे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर शिंदे यांनीही भिमाले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून दोघांमधील वादात भर पडली. तो एवढ्यावरच न थांबता भिमाले यांनी शिंदे यांच्याविरोधात १०१, तर शिंदेंनी भिमालेंविरोधात २५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा केला होता. महापालिकेच्या सभागृहातील वाद अब्रूनुकसानीच्या दाव्यापर्यंत पोचला. त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने प्रयत्न झाले; पण दोघेही ठाम राहिले होते.  या पार्श्‍वभूमीवर सदस्यांनी सभागृहाचे पावित्र्य राखले पाहिजे, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी सर्वसाधारण सभेत गुरुवारी केले. तेव्हा भिमाले आणि शिंदे यांनी वादादरम्यानचे शब्द मागे घेत असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. 

भिमाले म्हणाले, ‘‘आम्ही सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढील काळात शहराच्या विकासासाठी एकत्र काम करणार आहोत. काही राजकीय मतभेद निर्माण होतात. ते तेवढ्यापुरते मर्यादित असतात.’’ भिमाले आणि माझ्यातील वाद मिटला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

स्‍थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी शिष्टाई केली.

Web Title: arvind shinde srinath bhimale dispute politics