खेळाबरोबरच अभ्यासातही आयर्न पानसे ठरला अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - दिवसातील आठ तास शाळेत...त्यानंतर पाच तास टेबल टेनिसच्या कोर्टवर...आणि मग घरी येऊन शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण करणे, असा अत्यंत "बिझी' दिनक्रम असणाऱ्या व टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकलेला खेळाडू आर्यन पानसे याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत 91.04 टक्के गुण मिळविले आहेत. 

""तुम्ही किती तास अभ्यास करता हे महत्त्वाचे नाही; तर तुम्ही कसा अभ्यास करता, त्यातील संकल्पना समजून घेता का हे महत्त्वाचे आहे. ज्या समर्पण भावनेतून टेबल टेनिस खेळतो, त्याच समर्पण वृत्तीने अभ्यास केला, या शब्दांत आर्यनने आपल्या यशामागील गमक उलगडले. दहावीच्या परीक्षेत आर्यनपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी अर्थातच शहरात आहेत. परंतु राज्य पातळीबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिसमध्ये लहान गटात आपला वेगळा ठसा उमटविणारा आर्यन खेळाबरोबरच अभ्यासातही अव्वल असल्याचे वेगळेपण आहे. भुकूम येथील संस्कृती शाळेतील हा विद्यार्थी आहे. राज्य पातळीवरील टेबल टेनिसच्या रॅंकमधील तो पहिल्या आठ खेळाडूंमध्ये आहे. आर्यनचे वडील मुळात सॉफ्टवेअर इंजिनिअर. काही वर्षांपूर्वी ते कामानिमित्त अमेरिकेत होते. परंतु आर्यन तिसरीत शिकत असताना ते भारतात परतले. त्यानंतर पुण्यातच आर्यनचे शालेय शिक्षण सुरू झाले. अर्थात टेबल टेनिस या खेळाकडे त्याचा अधिक कल होता. ""टेबल टेनिसच्या स्पर्धेनिमित्त तो चेन्नई, चंडीगड, मेघालय दौऱ्यावर असायचा. शाळा आणि टेबल टेनिसचे प्रशिक्षण याचा समन्वय त्याने उत्तम साधला. गुणांची टक्केवारी अधिक असली, तरीही त्याला खेळाकडे लक्ष केंद्रित करायचे असल्याने तो वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे,'' असे त्याचे वडील निनाद पानसे यांनी सांगितले. 

Web Title: Aryan Panse top