जुन्नरमध्ये अपक्ष निवडणूक लढविणार

जुन्नरमध्ये अपक्ष निवडणूक लढविणार

नारायणगाव - ‘‘शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षाची उमेदवारी बहाल केली जाते. मात्र, पक्षसंघटनेसाठी मागील वीस वर्षे अहोरात्र झिजणाऱ्या महिलेची हकालपट्टी केली जाते. पक्षसंघटना वाढवली व पक्षाकडे उमेदवारी मागितली, हा माझा गुन्हा आहे काय,’’ असा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थित केला. तसेच, ‘‘निष्ठावान शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी मी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारच,’’ अशी घोषणा त्यांनी केली.

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या बुचके यांची शिवसेना पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली. आपली भूमिका विशद करण्यासाठी आज दुपारी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. या निमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत त्या भावनाविवश होऊन बोलत होत्या. बुचके यांच्या हकालपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार असल्याचा आरोप या वेळी कार्यकर्त्यांनी केला.

यापुढे कार्यकर्तेच माझे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अन्याय सहन न करण्याची शिकवण आम्हा शिवसैनिकांना दिलेली आहे. माझी मायबाप जनताच मला न्याय देईल.
 - आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com