Ashadhi Wari : पुणे मार्केट यार्डात २० हजार वारकऱ्यांचा मुक्काम

बुधवारी रात्रीपासून मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले.
Bharud in Pune market yard
Bharud in Pune market yardsakal
Summary

बुधवारी रात्रीपासून मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले.

मार्केट यार्ड - बुधवारी रात्रीपासून मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले. कोणी हार घालून, कोणी पाय धुवून, तर कोणी विविध वारकरी पोषक परिधान करून त्यांचे स्वागत केले. मार्केट यार्डात सुमारे १५०-२०० दिंड्यांच्या माध्यमातून सुमारे २० हजार वारकऱ्यांनी मुक्काम केला आहे. त्यामुळे संपूर्ण मार्केट यार्डात भक्तिमय वातावरण झाले होते. गुळभूसार विभागातील सुमारे ५० व्यापाऱ्यांनी आणि फळे, भाजीपाला, कांदा बटाटा विभागातील १०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांची व्यवस्था केली असल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष बाप्पू भोसले यांनी सांगितले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, सांयकाळी जेवण, दिवसभर विविध धार्मिक भजन-कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले, असे सांगितले.

राजेंद्र बाठिया, पोपटलाल ओस्तवाल, प्रवीण चोरबेले, नविन गोयल, विनोद गोयल, शभु गोयल, मुकेश गोयल, उमेश मांडोत, राजू काग, बाळासाहेब कोयाळीकर, अशोक लोढा, विजय मुथा, जसराज चौधरी, विलास भुजबळ, युवराज काची, बाप्पू भोसले, रोहन जाधव, महेश शिर्के, राजेंद्र भंडारी, सिद्धारूढ सन्स यांच्यासह मार्केट यार्डातील विविध व्यापाऱ्यांनी मुक्कामाची सोय, जेवण, मेडिकल किट, कीर्तन, भजन तसेच रेनकोटचे वाटप केले.

यंदाही मार्केट यार्डातील गुळ व भुसार विभागातील संपूर्ण स्वच्छता, औषध फवारणी, पावडर फवारणी, दोन दिवसांत पुरेसे पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे, लाईटची व्यवस्था केली. महापालिकेकडून फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com