Ashadhi Wari : हारी नामाच्या गजराने दुमदुमली पुण्यनगरी

पालखीचे आगमन शहरात होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तुकाराम, माऊलींच्या गजराने वयोवृद्ध बाल वारकरी यांच्या चेहऱ्यावर उत्साह संचारला होता.
Palkhi Sohala enter in pune
Palkhi Sohala enter in punesakal
Summary

पालखीचे आगमन शहरात होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तुकाराम, माऊलींच्या गजराने वयोवृद्ध बाल वारकरी यांच्या चेहऱ्यावर उत्साह संचारला होता.

शिवाजीनगर - पालखीचे आगमन शहरात होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तुकाराम, माऊलींच्या गजराने वयोवृद्ध बाल वारकरी यांच्या चेहऱ्यावर उत्साह संचारला होता. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावरील तुळशीवृंदावन आकाशाकडे झेप घेतल्याचे दिसून येत होते. टाळ-मृदंग भजनाने वारकरी तल्लीन होऊन, हारी नामाचा गजर करीत होते. पालखीच्या स्वागतासाठी रस्ते स्वच्छ करून जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्त्यांनी जणू वारकऱ्यांच्या सेवेचा ध्यासच घेतला होता. ठीक - ठिकाणी अन्नदान , पाणी वाटप करण्यात आघाडीवर होते. वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य सेवक मनापासून झटत होते. भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती शोभून दिसत होती. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी पालख्या व वारकऱ्यां सोबत फोटो काढण्यात मग्न होते.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत मी देहूतून आलो. वयानुसार थकवा येतो परंतु पाय धुतले की पूर्ण थकवा निघून जातो.

त्यामुळे पुढचा प्रवास करण्यासाठी ऊर्जा मिळते. तीस वर्षापासून नियमित वारीला येतो मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडला. कोरोना मधून वाचलो त्यामुळे आता विठुरायाचे दर्शन घेता येईल. आपण भाग्यवान आहोत, म्हणून पुन्हा वारी करण्याची संधी विठुरायाने दिली.

- अण्णासाहेब म्हात्रे वारकरी, बदलापूर जिल्हा जालना

३५ वर्षांपासून आम्ही वारीला येतो. वारीला आल्यावर साक्षात विठ्ठल भेटल्याचा अनुभव येतो. विठ्ठलाकडे एकच मागणं आहे, कोरोना कायमचा नष्ट होऊ दे. दरवर्षीची वारी सर्व वारकऱ्यांना मोठ्या उत्साहाने करता यावी. वारी करताना साक्षात विठ्ठल सोबत असल्याचा अनुभव येतो त्यामुळे कोणतीही चिंता उरत नाही.

- प्रभावती मोरे महिला वारकरी अहमदनगर

सकळीकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥

रूप दाखवीं रे आतां । सहस्त्रभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥

शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥२॥

तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥

या अभंगामधे जशी तुकोबांच्या नयनांना कान्हाला बघण्याची भुक लागली आहे. तशीच कोरोना मुळे सर्व वारकरी आणि माझ्या सारख्या भक्तांना वारी आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्याची ओढ लागली होती. आज माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालख्यांच्या आगमनाने आणि दर्शनाने माझ्यातच नाही पुण्यनगरित एक अलौकिक चैतन्य निर्माण झाले आहे. आज दोन वर्षानी हारी नामाच्या अखंड गजराने पुण्यनगरी दुमदुमून गेली. आज या चैतन्यमय सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.

- किर्तिराज आगलावे, पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेले पुणेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com