Ashadhi Wari : बारामती नगरी झाली विठ्ठलमय..... नादघोषाने नगरी दुमदुमली...

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती नगरीत मंगळवारी (ता. 28) मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात स्वागत केले गेले.
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
Sant Tukaram Maharaj Palkhi SohalaSakal
Summary

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती नगरीत मंगळवारी (ता. 28) मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात स्वागत केले गेले.

बारामती - संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती नगरीत मंगळवारी (ता. 28) मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात स्वागत केले गेले. विठ्ठलाच्या नामघोषाने आज अवघी बारामतीनगरी विठ्ठलमय झाली होती. शहराच्या वेशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले.

नगरपालिकेच्या वतीने चौकात सजावट करण्यात आली होती, वारक-यांच्या शिल्पाला देखील फुलांची सजावट करण्यात आली होती. शारदा प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला असून पालखीचा मुक्काम त्यातच असेल.

कोविडच्या संकटानंतर दोन वर्षांनी पालखी सोहळ्यांचे बारामतीत आगमन झाल्यामुळे आज समस्त बारामतीकरांनी आपापल्या परिने सेवा देण्याचा प्रयत्न केला. शहरातील असंख्य मंडळे, संस्था व व्यक्तिगत पातळीवरही लोकांनी वारक-यांना अन्नदान, चहा फळांसह बिस्कीटे व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. अनेक महिला व पुरुष उंडवडीपासून बारामतीपर्यंत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

वारक-यांची गैरसोय होऊ नये या साठी प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. देहू ते पंढरपूर मार्गावर पुण्यानंतर सर्वात मोठे शहर म्हणून बारामतीची ख्याती आहे. वारक-यांना सर्व सुखसुविधा देण्याचा प्रशासनासोबतच स्थानिक नागरिकही प्रयत्न करतात. अनेक दिंड्यांचा मुक्काम आज विविध ठिकाणी ठरल्याप्रमाणे होता.

शारदा प्रांगणात पालखी विसावल्यानंतर समाजआरती झाली, रात्री भजन व कीर्तन देखील होणार आहे. दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी पाटस रस्त्यापासून ते शारदा प्रांगणापर्यंत मोठी गर्दी उसळली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com