दिवेघाटातून वळणाच्या वाटेवरील माऊलींना पाहण्यासाठी तुडुंब गर्दी

टाळ-मृदंगाच्या गजरात सोन्या-माऊलीबरोबर सर्जा-राजाने दिवेघाट लिलया सर
Ashadi wari 2022 Palkhi of Saint Dnyaneshwar Mauli in Diveghat Devotee of vitthal supriya sule at the Diveghat
Ashadi wari 2022 Palkhi of Saint Dnyaneshwar Mauli in Diveghat Devotee of vitthal supriya sule at the Diveghat sakal

उंड्री : माऊली... माऊली... माऊली...चा जयघोष करीत सोन्या-माऊलीबरोबर सर्जा-राजाच्या साथसंगतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रथ दिवेघाटातून डौलात चालला होता. माऊलींची सोहळा पाहण्यासाठी दिवेघाटावर अवघा वैष्णवभक्त अवतरलेला दिसून आला. टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींच्या रथावर हलकीशी वरुणराजाची बरसात झाली. दिवेघाटातील देखणा सोहळा मोबाईलच्या किलकिलाटात अनेकांनी टिपला गेला, तर भाविक भक्तांनी लक्ष लक्ष लक्ष नेत्रांमध्ये साठवला. हडपसर गाडीतळ येथील चहा-पानानंतर माऊलींची पालखी वडकीनाला येथील विसाव्याच्या ठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास आली आणि पावणे तीनच्या सुमारास दिवेघाट मार्गे सासवडकडे मार्गस्थ झाली.

खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, सरपंच अरुण गायकवाड, तहसीलदार तृप्ती कोलते, बीडीओ संदीप तिडके, विशेष कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शालिनी कडू-पाटील, कमलाकर रणदिवे यांनी वैष्णवभक्तांच्या उपस्थितीत स्वागत केले.दरम्यान, माऊलींची कृपा झाली आणि वरुणराजाने दहा पंधरा मिनिटे वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे वैष्णवभक्तांनी समाधान व्यक्त केले. दिवेघाटात पावसाने सुरूवात करताच वैष्णवभक्तांनी इरले अंगावर घेत तर काहींनी पावसात भिजत माऊलींच्या नामाचा जयघोष सुरू केला. वडकीनाला येथील दोन तासांच्या विसाव्यानंतर माऊलींच्या रथाला मानाच्या चार बैलजोड्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनीही बैलजोड्या जोडल्या होत्या. सर्जा-राजाची जोडी दिमाखात चालताना शेतकऱ्यांबरोबर वैष्णवभक्तही हरखून गेला होता. दिवेघाटाची वाट प्रशासनाने सोपी केल्यामुळे वैष्णवभक्तही समाधानी होता.

दिवे घाटावरील श्री विठ्ठलाच्या भव्यदिव्य मूर्तीचे दर्शन घेत वैष्णवांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. वैष्णवभक्तांचा दिवेघाटातील सोहळा देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी मोबाईलमध्ये टिपला. कोरोनामुळे मागिल दोन वर्षे पालखी सोहळा झाला नाही, त्यामुळे यावर्षी महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवभक्तांचा आषाढीवारीला महापूर लोटला होता. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरीराजा नाराज होता. पांडुरंगच काय ते करील, असे म्हणत वैष्णवभक्त माऊली माऊली माऊलीचा नामघोष करीत होता. वरुणराजाने आज हजेरी लावली आहे. गावाकडे पाऊस झाला असला, तर पेरणी करून पुन्हा वारीत सहभागी होणार असल्याचे पारडी (हिंगोली) येथील काशीनाथ सीताराम सांगळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com