'नॉन स्टॉप' साडेबत्तीस तासात 'त्याने' सोळावेळा सर केला सिंहगड

'नॉन स्टॉप' साडेबत्तीस तासात 'त्याने' सोळावेळा सर केला सिंहगड

पुणे : सिंहगडावर भटकंती करणारे खूप आहेत. ऍडव्हेंचर म्हणून सिंहगडच्या वेगळ्या वाटा चोखळणारे वाटाडेही आपल्याला भेटतात; पण आशिष कसोदेकर या अवलियाने न थांबता तब्बल सोळावेळा सिंहगड सर केला. त्यांनी 32 तास 30 मिनिटांत ही कामगिरी फत्ते केली.

लडाखमध्ये 555 किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारा एकमेव भारतीय असलेले कासोदेकर यांची "एव्हरेस्टिंग' या उपक्रमाअंतर्गत ही कामगिरी केली. 'एव्हरेस्टिंग' म्हणजे 8848 मीटर ही एव्हरेस्टची उंची नॉन स्टॉप चढणे. सिंहगडची उंची 563 मीटर आहे. आशिष यांनी 16 वेळा सिंहगड घाटरस्ता अंखड चालून; तसेच पळून एव्हरेस्टएवढी उंची पार केली. असा पराक्रम करणारे आशिष हे महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

या उपक्रमात त्यांना त्यांचे मित्र हरी दांपत्ती, मंगेश शिंदे, कौस्तुभ वर्तक यांनी मोलाची साथ दिली. स्वतःची ऍडव्हेंचर टुरिझमची कंपनी असलेले कसोदेकर अशा ऍडव्हेंचर कामगिरी नेहमी करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com