गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आश्लेषा महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे : गोव्यात होणाऱ्या सतराव्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  साहित्यिक आश्लेषा महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
कला व संस्कृती विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक मीरा तारळेकर यांच्या हस्ते 20 ऑक्टोबरला ढवळी, फोंडा येथे होणार आहे

पुणे : गोव्यात होणाऱ्या सतराव्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  साहित्यिक आश्लेषा महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
कला व संस्कृती विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक मीरा तारळेकर यांच्या हस्ते 20 ऑक्टोबरला ढवळी, फोंडा येथे होणार आहे.

गोव्यासह पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी अशा विविध ठिकाणचे साहित्यिक या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. या संमेलनात ललित लेखनावर विशेष सत्राचे आयोजन केले असून, कविसंमेलन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, गोव्यातील युवा साहित्यिकांचा कलाविष्कार असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या मेघना सावईकर यांनी दिली.यापूर्वी या संमेलनाचे अध्यक्षपद  साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनीही भूषविले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashleesha Mahajan presides over Gomantak Mahila Sahitya Sammelan