भाजपा सरकार बेशर्म आहे - अशोक चव्हाण 

Ashok Chavan criticized BJP at Bhor Pune
Ashok Chavan criticized BJP at Bhor Pune

भोर (जि. पुणे) - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढलेले असून जनतेला जीवन सुरक्षीत वाटत नाही, परंतु या सरकारला मात्र त्याची चिंता नाही कारण हे सरकार बेशर्म सरकार आहे. बुलेट ट्रेन जाऊ द्या परंतु मुंबईची लोकल ट्रेन त्यांना निट चालविता येत नाही. या सरकारचा फाजील आत्मविश्वास त्यांना दाखविण्याची वेळ आली असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. येथील अभिजीत भवन कार्यालयात बुधवारी (ता. ११) भोर नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी अध्यक्ष देवीदास भंन्साळी, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, महिलाध्यक्षा गितांजली शेटे, दिलीप बाठे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मला आवारे, नगरसेवक पदाचे उमेदवार पद्मिनी तारु, चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, आशा रोमण, सचिन हर्णसकर, तृप्ती किरवे, रुपाली कांबळे, अमित सागळे, अम़ृता बहिरट, गणेश पवार, वृषाली घोरपडे, देविदास गायकवाड, सोनम मोहिते, अनिल पवार, स्नेहा पवार, आशा शिंदे व सुमंत शेटे आदीं उपस्थित 
होते. 

अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर टिका करून जनतेचा सरकारवरील रोष व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता ४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीची आठवण झाली आणि त्यांनी गांधी परिवारावर टिका केली. कित्येक वर्षे देशाचा परिवार गांधी परिवाराने सांभाळला, परंतु ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचे महत्व 
काय कळणार अशा शब्दात टिका केली. काळा पैसा भारतात आणण्याच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारमुळे देशातील पांढरा पैसा मात्र परदेशात गेला. देशात अदृश्य आणीबाणी लागू झाले असल्याचे सांगत गेल्या तीन वर्षात महराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण ३८ टक्यांनी वाढले असल्याचे  सांगितले. भोर नगरपालिकेतील काँग्रेसची सत्ता कायमच राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी नगराध्यक्ष अॅड. जयश्री शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. उमेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com