Vidhan Sabha 2019 : काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष फरगडेंचा राजीनामा; भाजपात प्रवेश  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष अशोक फरगडे यांनी आज (ता. १२) सकाळी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दौंड तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुपारीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप नेते जालिंदर कामठे यांनी यासाठी पुढाकार घेतला. कामठे यांनी सकाळीच वरवंड गाठले आणि फरगडे यांच्या घरी जाऊन त्यांना सोबत घेतले. त्यानंतर त्यांनी दौंडचे आमदार आणि भाजप उमेदवार राहूल कूल यांची आणि फरगडे यांची भेट घालून दिली. या भेटीतच कुल यांच्या उपस्थितीत फरगडे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी कामठे, मुरली निंबाळकर आदी उपस्थित होते.                

 ''राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अवमानाची वागणूक दिली जाते. सन्मान दिला जात नाही. केवळ निवडणुकीपुरताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळेच काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश करत असल्याचे,'' फरगडे यांनी यावेळी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Fargade resignation of Head of the Daund District Congress and entered into BJP