तंटामुक्ती अध्यक्षपदी अशोक शेवाळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

मांजरी (पुणे) : येथील शेवाळेवाडी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक साहेबराव शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शेवाळेवाडी गावची दोन महिन्यापूर्वी पोटनिवडणूक पार पडली आहे. त्यानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडीबाबतचा विषय मांडण्यात आला होता. माजी सरपंच युवराज शेवाळे यांनी या पदासाठी अशोक साहेबराव शेवाळे यांचे नाव सचविले.

सन्मित्र बँकेचे माजी चेअरमन संजय शेवाळे माजी उपसरपंच संदीप शेवाळे व अँड. रमेश शेवाळे यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी न आल्याने अशोक शेवाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शेवाळे यांचे अभिनंदन केले.

समितीच्या उपाध्यक्ष पदी श्रीनिवास शेवाळे व सचिन शेवाळे यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली

सरपंच अशोक शिंदे, माजी उपसरपंच संजय कोद्रे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला चिटणीस भारतीताई शेवाळे, माजी सरपंच वसंत शेवाळे  आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Ashok Shewale appointed as chairman of tanta mukti samiti in Manjri