सायकलने प्रवास करून अष्टविनायक दर्शन यात्रा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

पिंपरी-चिंचवडमधील भुजबळ बंधूंचा पाच दिवसांत ६५० किलोमीटर प्रवास
पिंपरी - श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेत आणि किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपरी-चिंचवडचे गणेश भुजबळ व त्यांचे चुलत बंधू ऋषिकेश भुजबळ यांनी ‘अष्टविनायक दर्शन’ सायकल यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली. पाच दिवसांत सुमारे साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला.

चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिरापासून भुजबळ बंधूंनी सायकल यात्रेला सुरवात केली. इंडो सायकलिस्ट क्‍लबचे (आयसीसी) सदस्य अजित पाटील, अमित खरोटे यांनी त्यांना थेऊर येथील चिंतामणी मंदिरापर्यंत साथ दिली. तिथून पुढे लोणी काळभोर, पाटस, चौफुलामार्गे मोरगावला जाऊन मोरेश्‍वराचे दर्शन घेतले. महाप्रसादाचा लाभ घेतला. थोडी विश्रांती घेऊन सिद्धटेकला गेले. सिद्धविनायकाचे दर्शन घेऊन रात्री मुक्काम केला. तिथेच सायकलचे पंक्‍चर काढून दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धिविनायकाच्या आरतीचा लाभ घेऊन रांजणगावकडे मार्गस्थ झाले. देऊळगाव राजे, तांदळी, निर्वी, नाव्हेरस, आंबलेमार्गे रांजणगावला पोचून महागणपतीचे दर्शन घेतले. हा रस्ता अत्यंत खराब असल्याने सायकल तीन वेळा पंक्‍चर झाली. ते काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे त्यांना सहकार्य लाभले. रांजणगावला भक्त निवासात मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी मलठणमार्गे पारगाव शिंगवी, रांजणी आणि नारायणगावमार्गे ओझरच्या विघ्नेश्‍वराचे दर्शन घेतले. लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचे दर्शन घेऊन जुन्नर येथील किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पूर्णानगरला मुक्काम केला. चौथ्या दिवशी महडच्या वरद विनायक आणि पालीच्या बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेतल्यावर अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली. पाली गावातील भक्त निवासात मुक्काम करून परतीचा प्रवास पूर्ण केला.

Web Title: Ashtavinayak appeared to travel by bicycles