अश्विनी असवले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी शिवाजी असवले यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच सुप्रिया मालपोटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

टाकवे बुद्रुक : टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी शिवाजी असवले यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच सुप्रिया मालपोटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी जगताप यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.उपसरपंचपदासाठी अश्विनी असवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास असवले, अविनाश असवले, मीना असवले, ,सुशिला मालपोटे,गोरख मालपोटे, साधना असवले, सहिद्रा लोंढे, भीमराव साबळे आदी सदस्य उपस्थितीत होते.

ग्रामविकास अधिकारी एस.बी.बांगर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले. असवले यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी भंडारा गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. मारूती असवले यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Ashwini Aswale elected unopposed as Dy Sarpanch