कर्जाचा हप्ता भरण्याची केली विनंती; कर्जदाराकडून व्यवस्थापकाचाच निघृण खून

Assassination of a manager borrower requesting payment of a loan installment urali kanchan Pune
Assassination of a manager borrower requesting payment of a loan installment urali kanchan Pune

उरुळी कांचन (पुणे) - कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती करणाऱ्या व्यवस्थापकाचा कर्जदाराने  खून केल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शिंदवने रस्त्यावर मंगळवारी (ता. 16) दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

रविंद्र प्रकाश वळकुंद्रे (वय -२३ वर्षे, रा. नक्षत्र सोसायटी, उरुळी कांचन , ता.हवेली, मूळगाव- मारकटवाडी , ता.माळशिरस जि. सोलापूर)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून बजाज फायनन्स या खाजगी वित्तीय कंपनीच्या व्यवस्थापक आहे. खून करणाऱ्या कर्जदाराचे नाव राहुल लक्ष्मण गाढवे (वय -२३ वर्षे, रा. सध्या चंदनवाडी , बोरी भडक, ता.दौंड, मुळगव- देवळगाव, ता. परंडा , जि. उस्मानाबाद) असे आहे. वरील प्रकार 98 हजार रुपयांच्या वैयक्तिक कर्जावरुन घडला आहे. राहुल याने खून केल्यानंतर कांही वेळातच स्वतःहून लोणी काळभोर पोलिसांच्या हवाली झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याने कांही महिण्यांपूर्वी बजाज फायनन्स या खाजगी वित्तीय कंपनीकडून ९८ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. मात्र, मागील वर्षभराच्या काळात कोरोनामुळे त्याचा रोजगार बुडाला होता.  राहुल  कर्जाचे हप्ते वेळेवर भरु शकला नव्हता. यामुळे रविंद्र याने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी राहुल याच्या मागे लागले होते. मंगळवारी राहुल बजाज फायनन्स कंपनीच्या उरुळी कांचन येथील कार्यालयात आला असता, रविंद्र  यांंने  पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते भरण्याची विनंती केली. यावर राहुल याने पैसे नसल्याने, कर्जाचा हप्ता भरण्यास नकार दर्शवला. यावरुनच राहुल  व  रविंद्र यांच्यात बाचाबाची झाली.

बाचाबाचीनंतर दोघेही वाद घालत, बजाज फायनन्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर रस्त्यावर आले. त्याही ठिकाणी दोघांची तुतु-मैमै चालू असतानाच, राहुलने खिशात लपवलेल्या तिष्ण हत्याऱ्याने रविंद्र यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली.या हल्ल्यामुळे जखमी झालेले रविंद्र रस्त्यावर कोसळले. घटना रस्त्यावर घडत असल्याने, उरुळी कांचन-शिंदवने रस्त्यावरुन ये-जा करणारे लोक घटनास्थळी जमा झाले. लोक जमा होत असल्याचे लक्षात येताच, राहुल याने घटनास्थळावरुन पळ काढला. 

Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास'

दुसरीकडे घटनास्थळी जमा झालेल्या नागरीकांनी जखमी रविंद्र यांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहित डॉक्टरांनी दिली. त्यानंतर काही वेळातच आरोपी राहुल गाढवे हा खूनात वापरलेल्या हत्याऱ्यासह उरुळी कांचन पोलिस चौकीत हजर झाला. 

दरम्यान या प्रकरणातील आरोपी राहुल गाढवे हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनावर ट्रक चालक म्हणून काम करीत आहे. घटनास्थळी लोणीकाळभोरचे पोलिस निरीक्षक
सुरज बंडगर व सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधऱी यांनी भेट दिली असून, पुढील तपास पोलिस निरीकक्षक सुरज बंडगर करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com