विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली चालणार मदत, पुनर्वसनाचे काम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पुणे विभागात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव, मदत व पुनर्वसनाचे काम सुनियोजितपणे चालण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना सर्वाधिकार दिले आहेत. त्यानुसार त्यांच्या नियंत्रणाखाली मदत व पुनर्वसनाचे काम चालणार आहे.

पुणे : पुणे विभागात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव, मदत व पुनर्वसनाचे काम सुनियोजितपणे चालण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना सर्वाधिकार दिले आहेत. त्यानुसार त्यांच्या नियंत्रणाखाली मदत व पुनर्वसनाचे काम चालणार आहे.

मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे देशभरातून आलेल्या राष्ट्रीय प्रतिसाद दल, भारतीय वायूसेना, थल सेना, राज्य आपत्ती प्रतिसाद दल व इतर प्रतिसाद यंत्रणा यांना पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व तुकड्यांच्या नियुक्त्या, जीवनावश्यक वस्तूंचे नियंत्रण, पूरस्थितीनंतर करावयाचे मदत व पुनर्वसन आपल्या अधिपत्याखाली करण्यात यावे.  

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा होणारी रक्कम, सार्वजनिक विश्वस्त संस्था, खासगी व्यक्ती, विविध मंदिरे, सी.एस.आर. व इतर स्त्रोतातून वस्तू स्वरूपात जमा होणाऱ्या वस्तू, औषधे याबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करावे.

तसेच पूरस्थितीत मदत छावणीत आश्रय घेतलेल्या व्यक्तींच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था, अन्नधान्य, कपडे, औषधोपचार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनानूसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असे पत्रात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistance and Rehabilitation work under the control of the Divisional Commissioner Deepak Mhaiskar