
रस्त्याच्या कडेला सकाळच्या वेळी बाळाला टाकले होते. थंडी खूप असल्याने बाळ कुडकुडत होते. घटनास्थळी पोलीस पोहोचले तेंव्हा बाळ खूप रडत होते.
कात्रज : कात्रज घाटात अवघ्या एक दिवसाचे बाळ कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी जबाबदारीचे भान राखत बाळाला जीवनदान दिले आहे. रस्त्याच्या कडेला सकाळच्या वेळी बाळाला टाकले होते. थंडी खूप असल्याने बाळ कुडकुडत होते. घटनास्थळी पोलीस पोहोचले तेंव्हा बाळ खूप रडत होते. मात्र, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरिक्षक मधुरा कोराणे यांनी बाळाला उचलून घेतले. त्यावेळी बाळाला मायेची उब मिळताच बाळ रडायचे थांबले.
तासभर जरी उशिर झाला असता तर...
घडलेल्या प्रकराबद्दल बोलताना कोराणे म्हणतात, 'घाटात कुत्र्यांच्या वावर मोठ्या प्रमाणात असून कदाचित तासभर जरी उशिर झाला असता तर बाळ वाचलं नसते. सुरवातीला शंभर नंबरवर घाटातून जाणाऱ्या दुचाकीवरील प्रवाशाने याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आम्ही घटनास्थळ गाठले. ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी बाळ जोरजोरात रडत होते. कदाचित त्याला भूक लागली होती. मी त्याला जवळ घेतले, आणि ते रडायचे थांबले. त्यानंतर बाळाला गाडीवरून ससून रुग्णालयात दाखल करेपर्यंत बाळ रडले नाही'.
सॅल्युट! 'त्या' पोलिस महिला अधिकाऱ्याला; धावाधाव करून बाळाला वाचवलं
सकाळी साडेतीनच्या सुमारास आमचा कात्रज घाटात राऊंड झाला होता. मात्र, त्यावेळी असा कुठलाही प्रकार निदर्शनास आला नाही. त्यानंतर सकाळी सवासातच्या सुमारा या घटनेबद्दल आम्हाला पहिला कॉल आला आणि आम्ही घटनास्थळी दाखल झालो. बाळ आता सूसून रुग्णालयात आहे. बाळ अतिदक्षता विभागात असून बाळाची स्थिती स्थिर असल्याची माहिती कोरोणे यांनी दिली.
कसे मिळाले बाळाला जीवदान? वाचा सविस्तर
''अनैतिक संबंधातून हे घडले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण, बाळ पुरुष जातीचे असून बाळाची प्रकृती सदृढ आहे. त्यामुळे बाळाला असे रस्त्याच्या कडेला फेकून देण्याचे कुठलेही कारण नाही''
- मधुरा कोराणे, सहायक पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे