उलगडणार खगोलशास्त्राचे अंतरंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची ‘मी शास्त्रज्ञ कसा झालो?’ आणि ‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’ ही दोन पुस्तके ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतीच प्रकाशित केली आहेत. या निमित्ताने ‘सकाळ प्रकाशन’ व हडपसर येथील बनकर क्‍लासेसतर्फे रविवारी (ता. १७) सकाळी १० वाजता डॉ. नारळीकर यांची प्रकट मुलाखत व प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम आयोजिला आहे. हडपसर-माळवाडी परिसरातील साधना विद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 

सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉ. नारळीकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ‘मी शास्त्रज्ञ कसा झालो?’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले असले तरी ते सर्व वयोगटांतील वाचकांना प्रेरणादायी ठरेल. डॉ. नारळीकरांवर ज्यांचा प्रभाव आहे, अशा शास्त्रज्ञांची माहिती व त्यांच्या शोधाचे महत्त्व, विविध वैज्ञानिक संकल्पना तसेच कथित चमत्कारांविषयीची शास्त्रीय प्रतिपादने अशा विविध विषयांचा समावेश या पुस्तकात आहे. 

‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’ या पुस्तकात एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक घडामोडींचा आढावा घेतला असून मराठीतून शिक्षण, विज्ञान व गणिताची परिभाषा, मराठी विज्ञानकथांचे स्वरूप आणि भविष्य, भारतीय संशोधकांची सद्य:स्थिती, समस्या अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे. 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अकरावीसाठी विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरच्या विविध संधी या विषयांवर बनकर क्‍लासेसचे संचालक जितेंद्र बनकर मार्गदर्शन करणार आहेत.

सवलतीच्या दरात पुस्तके
‘मी शास्त्रज्ञ कसा झालो?’ आणि ‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’ या पुस्तकांची किंमत प्रत्येकी २०० रुपये आहे. कार्यक्रम स्थळी ही दोन्ही पुस्तके आकर्षक सवलतीत वाचकांना मिळतील. ‘सकाळ प्रकाशना’ची सर्व पुस्तके सकाळ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये आणि महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 

ऑनलाइन खरेदीसाठी - www.sakalpublications.com/ amazon.in

Web Title: Astronomy