Atal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

दौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघवती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्‍वास आणि पक्ष व संघटनेवर नितांत विश्‍वास असलेल्या वाजपेयीजींच्या आठवणींनी दौंडकरांना गहिवरून आले होते.

दौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघवती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्‍वास आणि पक्ष व संघटनेवर नितांत विश्‍वास असलेल्या वाजपेयीजींच्या आठवणींनी दौंडकरांना गहिवरून आले होते.

दौंड शहरात २ सप्टेंबर १९८३ रोजी पुणे जिल्हा भाजपच्या वतीने वाजपेयी यांचा जाहीर सत्कार महात्मा गांधी चौकात करण्यात आला होता. सभेच्या आठवणी सांगताना पक्षाचे तत्कालीन जिल्हा चिटणीस मोहनलाल भंडारी म्हणाले, ‘‘सभेस दौंड तालुक्‍यासह शेजारील बारामती, इंदापूर, शिरूर, श्रीगोंदे तालुक्‍यातून अपूर्व जनसागर लोटला होता. पांढरे शुभ्र धोतर व झब्बा परिधान करणारे, समर्पक हातवारे करणाऱ्या अटलजींची ओघवती व मधाळ वाणीने जनसागर मंत्रमुग्ध झाला होता. शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्याचबरोबर ग्राहकांना योग्य भावाने व वेळेवर हा माल मिळाला तरच देश सुजलाम्‌-सुफलाम्‌ झाला असे म्हणता येईल, असे वाजपेयींनी आपल्या भाषणात सांगितले होते. सभेत कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना, व्यक्तीवर थेट टीका न करता देश, राज्य व स्थानिक प्रश्नांवर मात्र त्यांनी हल्लाबोल केला होता.’’ 

सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष व दौंडचे जनता पक्षाचे आमदार राजाराम ताकवणे होते. डॉ. अरविंद लेले, विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह विश्‍वास गांगुर्डे, महिला आघाडीच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षा प्रा. सुशीलाताई आठवले, संभाजी भुजबळ, कांचनभाई शहा, प्रकाशलाल बोगावत, चंपालाल सरनोत, गिरीश अग्रवाल व्यासपीठावर होते, अशी माहिती भंडारी यांनी दिली.

सोय कसली, कुचेष्टा केली...
अटलबिहारी वाजपेयी हे सभास्थानी दौंड शहरातील कुरकुंभ मोरीमधून पायी आले होते. मोरीवर रेल्वेने पादचाऱ्यांसाठी बांधलेला पादचारी पूल त्यांच्या नजरेतून सुटला नाही. पुलाकडे पाहून त्यांनी इतका उंच पूल कशाला बांधला, अशी विचारणा करीत माहिती घेतली. सभेत त्यांनी पुलाचा उल्लेख करीत रेल्वेने सोय तर दूरच, कुचेष्टा केली, अशी टीका केली होती. कालांतराने हा पूल वापरात नसल्याने रेल्वे प्रशासनाने पाडून टाकला. दुर्दैवाने आजही जुन्या व नवीन मोरीतून पादचारी व वाहनचालक चाचपडतच जात आहेत.

Web Title: Atal Bihari Vajpayee Speech in Daund