Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, राजीव गांधी जयंती सप्ताहाअंतर्गत आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम काँग्रेसने शनिवारपर्यंत स्थगित केले आहेत. 

पुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, राजीव गांधी जयंती सप्ताहाअंतर्गत आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम काँग्रेसने शनिवारपर्यंत स्थगित केले आहेत. 

जंगली महाराज रस्त्यावर शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. सदाशिव पेठेत उदय जोशी मित्रपरिवारातर्फे खुन्या मुरलीधर मंदिर चौकातील अटल कट्ट्यावर वाजपेयी यांना रंगावलीतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी वाजपेयी यांचे स्नेही हरिभाऊ नगरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी आदींनी मनोगत व्यक्त केले.

डेक्कन जिमखाना, नवी पेठ, कर्वेनगर, वडगाव शेरी आदी भागातही वाजपेयी यांना कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. वाजपेयी यांना पुणेकरांतर्फे रविवारी सायंकाळी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिरात श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यात विविध क्षेत्रांतील, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. नाना पेठेत अटल सेवा प्रतिष्ठान, बहुजन सेना, कर्तव्य फाउंडेशन आणि बजमे रेहबर कमिटीतर्फेही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटाची माहिती देणारे छायाचित्र प्रदर्शन काँग्रेसने स्थगित केले आहे. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहाच्या आवारातील कलादालनात कालपासून प्रदर्शन सुरू झाले; परंतु वाजपेयी यांच्या निधनामुळे ते शनिवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. रविवारी (ता. १९) आणि सोमवारी (ता. २०) ते खुले असेल, असे काँग्रेसतर्फे गोपाळ तिवारी यांनी कळविले आहे. 

 

Web Title: Atal Bihari Vajpayee Tribute