'अटल बस' योजनेला पुणेकरांची पसंती; एका दिवसांत ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

अटल योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसवर या योजनेची पाटी लावण्यात आली आहे. कुठेही बसा कुठेही उतरा पाच रुपये तिकीट असा उल्लेख करण्यात आला आहे.

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना स्वस्तात शाश्‍वत प्रवास करता यावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या अटल बस योजनेस प्रवाशांची पसंती मिळत आहे. गुरुवारी (ता.29) 49 हजार 792 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून त्यातून पीएमपीला दोन लाख 48 हजार 960 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर​

अटल योजनेंतर्गत सुरू झालेल्या या सेवेस आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यामुळे पीएमपीला आर्थिक हातभार मिळत असून प्रवाशांची देखील चांगली सोय होत असल्याचे या आकड्यांतून स्पष्ट होते. शहरातील गर्दीची ठिकाणे आणि अरुंद रस्त्यांवर बस सेवा उपलब्ध करून देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना दसऱ्यापासून सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत प्रवाशांना ठराविक मार्गांवर दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून देण्यात येत असून अवघ्या पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास करता येत आहे. डेपो टर्मिनल फीडर अंतर्गत प्रवाशांना ही बस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार​

डेपो टर्मिनल फीडर अंतर्गत गुरुवारी 53 मार्गावर 74 बस धावल्या. त्यातून 28 हजार 533 प्रवाशांनी प्रवास केला असून पीएमपीला 1 लाख 42 हजार 665 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर शहराच्या मध्यवस्तीत नऊ मार्गावर धावलेल्या 90 बसमधून 21 हजार 259 प्रवाशांनी प्रवास केला. या मार्गावरील तिकीट विक्रीतून पीएमपीला 1 लाख 6 हजार 295 रुपयांची कमाई झाली. रविवारपासून (ता.25) ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. तेव्हापासून त्यास मिळालेला हा सर्वाधिक प्रतिसाद असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.

काय म्हणावं या जोडप्याला; कुलूप तोडून बळकावलं बंद रो हाऊस!​

'कुठेही बसा कुठेही उतरा' :
अटल योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसवर या योजनेची पाटी लावण्यात आली आहे. कुठेही बसा कुठेही उतरा पाच रुपये तिकीट असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बसेस मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. आत्तापर्यंत या बसेसमधून सुमारे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

29 ऑक्‍टोबरला मिळालेला प्रवाशांचा प्रतिसाद :

सेवा क्षेत्र बस मार्ग प्रवासी तिकीट विक्रीची रक्कम
डेपो टर्मिनल फीडर 74 53 28,533 1,42,665
मध्यवस्ती 90 9 21,259 1,06,295
एकूण 164 62 49,792 2,48,960

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atal Bus Scheme launched by PMP is gaining popularity among Pune passengers