पिरंगुटला 'अटल टिंकरिंग लॅब' चे उद्घाटन  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पिरंगुट- "देशाला कशाची गरज आहे, या विचारातून संशोधन व्हावे . कुतुहलातून समाजाचे कल्याण होण्यासाठी त्याला दिशा असावी.  भारतात शेतीसाठी मजुरांच्या कमतरतेमुळे फार्म रोबोची गरज आहे. जिल्हा शिक्षण मंडळाच्या अटल टिंकरिंग लॅबमधून असा फार्म रोबोट तयार व्हावा. " असे आवाहन एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॅा. विवेक सावंत यांनी विद्यार्थ्यांना केले. 

पिरंगुट- "देशाला कशाची गरज आहे, या विचारातून संशोधन व्हावे . कुतुहलातून समाजाचे कल्याण होण्यासाठी त्याला दिशा असावी.  भारतात शेतीसाठी मजुरांच्या कमतरतेमुळे फार्म रोबोची गरज आहे. जिल्हा शिक्षण मंडळाच्या अटल टिंकरिंग लॅबमधून असा फार्म रोबोट तयार व्हावा. " असे आवाहन एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॅा. विवेक सावंत यांनी विद्यार्थ्यांना केले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट (ता.मुळशी) येथील ' अटल टिंकरिंग लॅब ' च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावंत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव  संदीप कदम होते. यावेळी सहसचिव ए.एम.जाधव ,पी.ई. कुलकर्णी ,  किरण देशपांडे , डॅा. पंडित शेळके , सुनील लाडके , एच.एस.घोलप , पूजा जोग , तात्या देवकर , भीमाजी गोळे , सुप्रिया धोत्रे , संतोष दगडे , दिलिप गोळे , राजाभाऊ वाघ , रामदास पवळे , जनाबाई गोळे , अतुल चिखले , सोमनाथ कळमकर आदी उपस्थित होते. कदम म्हणाले , " स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नवनिर्मिती आणि नवतंत्रज्ञानाला पर्याय नाही. संस्थेच्या माध्यमातून काळानुरुप शिक्षण उपलब्ध करून देण्य़ासाठी उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर सकारात्मक पद्धतीने करावा. " 

केंद्र शासनाने नीती आयोगाच्या माध्यमातून अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत देशातील अटल टिंकरिंग लॅब सुरु केल्या आहेत. कुतुहलातून संकल्पना , कल्पनेतून निर्मिती आणि निर्मितीतून संशोधन या चतुःसूत्रीवर आधारित अटल टिंकरिंग लॅबची उभारणी माध्यमिक शाळांमधून करण्यात येत आहे.  या उपक्रमातूनच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने पिरंगुट , कामशेत ,  सुपे , आकुर्डी व वाघोली आदी शाळांमधून ही प्रयोगशाळा सुरू केली आहे. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी वीस लाख रुपये अनुदान मंजूर झालेले असून सध्या प्रत्येकी बारा लाख रुपये मिळालेले आहेत.  इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे चाळीस विद्यार्थी या प्रयोगशाळेत काम करणार आहेत. अत्याधुनिक इलेक्ट्रॅानिक व इलेक्ट्रिक साहित्य , संगणक , रोबोटिक तंत्रज्ञान , थ्रीडी प्रिंटर्स आदी साहित्य या प्रयोगशाळेत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Web Title: atal tinkering lab news pirangut