'अथर्व'तर्फे मोफत शिबिराचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगरमधील अथर्व रुग्णालयाच्या वतीने 23 ते 31 जानेवारीदरम्यान मुळव्याध या आजारावर मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सर्वसामान्य लोकांची मोफत मुळव्याध तपासणी केली जाईल. ज्यांना पुढची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, त्या लोकांना होणाऱ्या खर्चामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. संदीप अगरवाल यांनी दिली.

'बायोलॉजिकल इलेट इम्पेडन्स ऑटो गेझर पेटंट तंत्रज्ञानाने सध्या मुळव्याधीवरील उपचार अगदी सोपा झालेला आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया बिनटाक्‍याची, कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता 10-15 मिनिटांत होऊ शकते. ह्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयांमध्ये जादा वेळ थांबावे लागत नाही. दुर्बिणीद्वारे तपासणी करता आल्यामुळे रुग्णांना दुर्धर आजारांची माहिती मिळते व त्यातून प्रभावी उपचार पद्धतीने आजारापासून मुक्तता मिळवता येते, असे डॉ. अगरवाल यांनी सांगितले.

Web Title: atharva to organize health camp