‘अथश्री’चे पुन्हा राष्ट्रीय स्तरावर कौतुक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

पुणे - खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ या गृहप्रकल्पाला ‘सिनिअर सिटिझन हौसिंग प्रोजेक्‍ट ऑफ दी ईयर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यामुळे ‘अथश्री’चे पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे.

‘एनडीटीव्ही’च्या वतीने दरवर्षी बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘एनडीटीव्ही प्रॉपर्टी’ पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार सोहळा पुणे शहरात आयोजित केला होता. या वेळी एनडीटीव्ही समूहाचे सल्लागार संपादक विक्रम चंद्रा, ‘अथश्री होम्स’चे कार्यकारी संचालक सुदेश खटावकर, परांजपे स्कीम्सचे बिझनेस डिपार्टमेंट हेड अमित परांजपे आणि परांजपे स्कीम्सच्या खरेदी विभागाचे उपाध्यक्ष श्रीराम बापट आदी उपस्थित होते.

याआधी देखील अथश्री गृहप्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली असून त्यांना आजवर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्‍ट सेगमेंट अंतर्गत ‘बेस्ट रेसिडेंशियल प्रोजेक्‍ट’, प्रॉपर्टी इंडिया इस्टेट ॲवॉर्डस अंतर्गत ‘सिनिअर सिटिझन हौसिंग प्रोजेक्‍ट ऑफ दी ईयर’ यांसारख्या अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Web Title: 'Athasrice again appreciated at the national level