वालचंदनगरच्या दोन राष्ट्रीयकृत बॅंकाचे एटीएम बंद

ऐन दिवाळीमध्ये ग्राहकांची गैरसोय
वालचंदनगरच्या दोन राष्ट्रीयकृत बॅंकाचे एटीएम बंद
वालचंदनगरच्या दोन राष्ट्रीयकृत बॅंकाचे एटीएम बंदsakal

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील बॅंक ऑफ इंडिया व कॅनरा बॅंक या दोन राष्ट्रीयकृत बॅंकाचे ऐन दिवाळामध्ये एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

वालचंदनगर मध्ये बॅंक ऑफ इंडिया व कॅनरा बॅंक या दोन राष्ट्रीय कृत बॅंकाच्या शाखा व एमटीएम सेंटर आहेत.मात्र गेल्या आठ -दहा दिवसापासून दोन्ही बॅंकेचे एटीएम बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. सध्या दिवाळीच्या उत्सवास सुरवात झाली आहे. इंदापूर,माळशिरस तालुक्यातील अनेक नागरिक वालचंदनगरमध्ये खरेदी करण्यासाठी येत आहेत. तसेच वालचंदनगर कंपनीतील कर्मचारी ही वालचंदनगरमध्ये खरेदी करीत असतात. एटीएम बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. तसेच बॅंक आॅफ इंडिया व कॅनरा बॅकेच्या खातेदारांनाही एमटीएम मधून पैसे काढता येत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत उभा राहून पैसे काढावे लागत असल्याचे जेष्ठ नागरिक अतुल तेरखेडकर यांनी सांगितले.

वालचंदनगरच्या दोन राष्ट्रीयकृत बॅंकाचे एटीएम बंद
"नवाब मलिक जावयामुळे वेडे झालेले जगातील पहिले सासरे"

यासंदर्भात बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक आशिष आंनद यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एटीएम मशिन बदलण्याचे काम सुरु असल्याने एटीएम सेंटर बंद आहेत.सदरचे काम दुसरी एजन्सी करीत आहे. कॅनरा बॅकेचे शाखा व्यवस्थापक शैलेश दराडे यांनी सांगितले की, एटीएम मशिनमध्ये बिघाड झाला असून लवकरच दुरुस्त करुन एमटीएम सेंटर सुरु करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com