अत्रे स्मृती प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे उद्या वितरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या ‘मोदीपर्व’ या पुस्तकास आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता. १३) पुणे येथे होणाऱ्या सोहळ्यात निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल.

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या ‘मोदीपर्व’ या पुस्तकास आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता. १३) पुणे येथे होणाऱ्या सोहळ्यात निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. कवी किशोर कदम, शांता लागू, सुधीर सुखटणकर, सुमीत राघवन, सुनील तटकरे, प्रभाकर वाईरकर आदींनाही अत्रे प्रतिष्ठानचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हास्य विनोद आनंद महोत्सवाच्या समारोपसत्रात पुरस्कार वितरण होईल. ‘सकाळ प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या पवार यांच्या ‘मोदीपर्व’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या पाच वर्षांच्या कालखंडाचे विश्‍लेषण करणाऱ्या पुस्तकास ‘कऱ्हेचे पाणी बृहत्‌ आत्मचरित्र आचार्य अत्रे’ पुरस्कार देण्यात येईल. 
या वेळी मृणालिनी फडणवीस, अभिजित देशपांडे, अद्वैत दादरकर, रेश्‍मा शिवडेकर, युवराज शहा, गीता निमोणकर, दीपेश म्हात्रे, उत्तरा केळकर, अंबुजा साळगांवकर यांनाही विविध विभागांसाठी आचार्य अत्रे यांच्या नावे देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाईल. आचार्य अत्रे प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ, शिवाजीनगर येथे सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atre Smruti Pratisthan Award Distribution