अभिनेता पुष्कर जोगसह सात जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - शिक्षकास नोकरीतून बडतर्फ करून अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अभिनेता पुष्कर जोग यांच्यासह जोग एज्युकेशनल ट्रस्टच्या सात जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे - शिक्षकास नोकरीतून बडतर्फ करून अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अभिनेता पुष्कर जोग यांच्यासह जोग एज्युकेशनल ट्रस्टच्या सात जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

कोथरूड येथील मयूर कॉलनीत जोग एज्युकेशनल ट्रस्टची प्र. बा. जोग इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. त्या शाळेत नरेश गुलाब चव्हाण (रा. औंध रस्ता) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. संस्थेने त्यांना मागासवर्गीय असल्यामुळे जाणीवपूर्वक अन्याय केला. शासनाच्या वतीने देण्यात येणारे वेतन आणि भत्त्यांचा लाभ दिला नाही. तसेच, शिक्षण संचालकांना चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे पदोन्नती मिळाली नाही, अशी तक्रार चव्हाण यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Atrocities against seven persons with actor Pushkar Jog

टॅग्स