esakal | धक्कादायक : 9 वर्षीय बालिकेवर सावत्र बापाकडून बलात्कार; आरोपी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक : 9 वर्षीय बालिकेवर सावत्र बापाकडून बलात्कार; आरोपी ताब्यात

नऊ वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाने बलात्कार केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मोरगाव जवळील शेरेवाडी येथे उघडकीस आला.

धक्कादायक : 9 वर्षीय बालिकेवर सावत्र बापाकडून बलात्कार; आरोपी ताब्यात

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर ः नऊ वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाने बलात्कार केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मोरगाव जवळील शेरेवाडी येथे उघडकीस आला. त्याबाबत पीडित मुलीची आई (वय २८) यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे.

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

पहिल्या पतीचे निधन झाल्यामुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह करून दुसरा पती केला शेरेवाडी येथील एका पोल्ट्रीमध्ये हे दोघेही ही कामाला होते. पहिल्या पतीचे दोन अपत्यांपैकी नऊ वर्षाच्या मुलीवर बापाची वाईट नजर पडली. मंगळवार (ता. ६) दुपारच्या वेळी पत्नी घराबाहेर गेली असता. मुलीवर बलात्कार केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणालाही सांगायचं नाही अशी धमकी दिली. पीडित मुलगी घडल्या प्रकारामुळे घाबरून थेट आजोळी जेजुरी (ता. पुरंदर) येथे गेली. आजोळी सर्व प्रकार सांगितला. इकडे मुलगी दिसत नसल्याचे पाहून फिर्यादी महिलेने पतीला विचारपूस केली. पतीही निरूत्तर झाला.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

अखेर दुसऱ्या दिवशी पती-पत्नी दोघेजण फिर्यादीचे माहेर असलेल्या जेजुरी येथे गेले असता, आरोपी पती घरी आला नाही घराजवळ पत्नीला सोडून गेला. माहेच्या नातेवाईकांनी घडलेल्या प्रकारची माहिती सांगितली. गुरुवार तारीख ९ रात्री याबाबत पोलिसांकडे फिर्याद नोंदविण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीविरुध्द बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)