ऍट्रॉसिटी कायदा बदलाची मागणी नको - आनंदराज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

पुणे - 'मराठा समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चांना पाठिंबा असून, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे; मात्र, मराठा समाजाने ऍट्रॉसिटीमध्ये बदल करण्याची मागणी करू नये,'' असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी केले. 
 
ऍट्रॉसिटी कायदा मराठी समाजाच्या विरोधातील नसून, दलित समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आहे. या कायद्यात बदल करण्याची मागणी अशीच सुरू राहिली, तर ऍट्रॉसिटी टिकविण्यासाठी मुंबईत दलित समाजाचा "भूतो न भविष्यती' मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. 
 
'दलितांवर नेहमीच अत्याचार होत आले आहेत. त्यामुळे अन्याय, अत्याचारापासून दलितांचे संरक्षण व्हावे, यासाठी ऍट्रॉसिटी कायद्याची गरज आहे. एससी आणि एसटी वर्गातील समाजाला या कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे हे समाज वगळता इतर सर्व समाजाच्या विरोधात या कायद्याचा वापर होतो. फक्त मराठा समाजाच्या विरोधातील हा कायदा नाही. तसेच ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर फक्त राजकीय लोक आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडीसाठी करतात. सामान्य नागरिकांकडून त्याचा गैरवापर होत नाही. त्यामुळे मराठा समाजाने ऍट्रॉसिटी कायद्यातील बदलाची मागणी मागे घ्यावी,'' अशी विनंतीही आंबेडकर यांनी केली. 
 
कथित बलात्काराच्या प्रकारावरून नाशिक येथे मोठी दंगल झाली. यातून दलित समाजावर हल्लेही झाले. हा प्रकार दोन समाजांत तेढ निर्माण करणारा आहे. 

त्यामुळे नाशिक येथील दंगलीची सरकारने सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

ऍट्रॉसिटीचा योग्य वापरही होत नाही 
खैरलांजी येथे दलित माय-लेकींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला. मानवतेला कलंक लावणारे हत्याकांड तेथे घडले; मात्र, या हत्याकांडातही ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ऍट्रॉसिटीचा गैरवापर तर सोडाच; परंतु योग्य वापरही केला जात नाही, असे आंबेडकर यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

Web Title: atrocity law changes demand