गाडी आडवी आली म्हणून मानेवर ब्लेडने वार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

रस्त्याने जाताना आचानक दुचाकी आडवी आल्याने 'तुला गाडी चालविता येत नाही का रे' असा जाब विचारत सराईत गुन्हेगारांनी तिघांबर ब्लेडने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना कोंढव्यातील शालिमार सोसायटीच्या रस्तावर मंगळवारी दुपारी घडली. एकाच्या मानेवर वार झाल्याने तो गंभीर जखमी आहे.
 

पुणे : रस्त्याने जाताना आचानक दुचाकी आडवी आल्याने 'तुला गाडी चालविता येत नाही का रे' असा जाब विचारत सराईत गुन्हेगारांनी तिघांबर ब्लेडने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना कोंढव्यातील शालिमार सोसायटीच्या रस्तावर मंगळवारी दुपारी घडली. एकाच्या मानेवर वार झाल्याने तो गंभीर जखमी आहे.

वसीम व आदिल (यांचे पुर्ण नाव व पत्ता नाही) यांच्यासह चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेहान रफिक महावत (रा. गॅलेक्‍सि हॉस्पीटलजवळ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान व त्यांचे मित्र शाहनवाज आणि अरबाज हे तिघे मोटरसायकलवरून घरी जात होते. शालीमार सोसायटीच्या रस्त्यावर वसीव व आदिल हे आचानक समोर आल्याने रेहानने आचानक ब्रेक दाबून गाडी थांबविली. यावेळी या चौघांनी रेहान यांना "तुला गाडी व्यवस्थित चालविता येत नाही का' असे विचारून भांडण सुरू केले. रेहान यांच्या मानेवर ब्लेडने वार करून त्यात गंभीर जखमी केले. शाहनवाज व अरबाज हे दोघे मदतीला गेले असता त्यांच्यावरही ब्लेडने वार करून जखमी केले. भर रस्त्यात तिघांवर ब्लेडने वार केल्याची घटना झाल्याने एकच खळबळ उडाली. पुढील तपास उपनिरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.

वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack by blade on one in pune