डिंगोरेत अवैद्य दारु विक्री करणाऱ्या हॉटेलवर हल्लाबोल

पराग जगताप
रविवार, 12 ऑगस्ट 2018

डिंगोरे (जुन्नर) : डिंगोरे गावात 1989 मध्ये तत्कालीन महिला सरपंच लिलाबाई सुकाळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दारुबंदी केली आहे. पोलिस व शासकीय उदासीनतेमुळे व खाऊगिरिमुळे तेथील दारुबंदी टिकवण्यासाठी त्यांना आजही झगडावे लागत आहे.

नुकतेच डिंगोरे ग्रामपंचायतने लेखी स्वरुपात ओतूर पोलिसांना गावच्या हद्दीत हॉटेल शिवशाहीत दारु विक्री होत असल्याची महिती देउन ती बंद व्हावी म्हणुन अर्ज दिला होता. मात्र ओतूर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने काल शनिवारी रात्री लिलाबाई सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अस्मिता थापेकर, भाजपा महिला आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाताई डुंबरे व माजी उपसरपंच मनोहर लोहोटे, तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर खरात, सदस्य मुरलीधर उकिर्डे, अंकुश थापेकर हे इतर ग्रामस्थांनी व महिलांनी मिळुन ह्या हॉटेलवर हल्लाबोल करुन हॉटेल मध्ये चालु असलेली अवैद्य दारुविक्री देशी विदेशी दारु बाटल्यासह पकडली व नतंर हॉटेल मालक बाळु बबन नायकोडीला दारुबाटल्यासह ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Attack at a hotel selling illegal liquor in Dingore