पुण्यात पोलिस चौकीतच पोलिसाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पिंपरी : पोलिसांनी चौकशीसाठी आणलेल्या व्यक्‍तीने गोंधळ घालत पोलिसाला धक्‍का बुक्‍की केल्याची घटना काळेवाडी पोलिस चौकीत मंगळवारी (ता. 25) दुपारी घडली. 
इम्तियाज बरकतअली अत्तार (वय 34, रा. परमवीर कॉलनी, राजवाडा नगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस नाईक महेश विनायकराव बारकुले (वय 35) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी कोहिनूर हॉटेलचे भागीदार पवनसिंग सताराम यादव हे दुसरा भागीदार सूरज देविदास कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी वाकड पोलिसांच्या टीम नंबर दोनने घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता त्यांचा तिसरा भागीदार इम्तियाज अत्तार याला चौकशीसाठी दुपारी सव्वातीन वाजता काळेवाडी चौकीत आणले. त्यावेळी इम्तियाज याने पोलिस चौकीत आरडा ओरडा करीत पोलिस कर्मचारी बारकुले यांना शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. तसेच पोलिस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक मुदळ करीत आहेत. 

Web Title: Attack on policeman at police station in pune