आर्थिक वादातून पुण्यात रॉड, तलवारीने माराहाण; थरार सीसीटिव्हीत कैद

Attack by rod and sword recorded in CCTV at Pune.jpg
Attack by rod and sword recorded in CCTV at Pune.jpg

पुणे : पुण्यात काही केल्या गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक वादातून समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कैद झाला असून त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

रॉड आणि तलवारीने झालेल्या या वादात तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

भर दिवसा एखाद्या दुकानात शिरून तलावर आणि रॉडने मारहाण करण्याची आरोपींची मजल गेली आहे. त्यामुळे पुण्यात नागरिकांवर पोलिसांचा किती धाक आहे हे यातून समोर येतं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com