तू माझी बायको पळवून आणली आहेस... तुला जिवंत सोडणार नाही...

crime
crime

मंचर (पुणे) : पत्नीला पळवून आणल्याच्या संशयावरून घराच्या पत्र्यावर चढून एकाने खात्री करण्याचा प्रयत्न केला. पण, पत्र्याचा आवाज आल्याने घरमालक जागा झाला. घरावर चोरटा आला, या संशयाने घरमालक शिडीच्या सहाय्याने पत्र्यावर गेला. त्यावेळी संबंधित व्यक्तीने, तू माझी बायको पळवून आणली आहेस. मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन घरमालकावर हल्ला केला. त्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला.

या संदर्भात घरमालकाने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते कळंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या इंदिरानगर येथे राहतात. गुरुवारी (ता. २) पहाटे दोनच्या सुमारास घराच्या पत्र्याचा आवाज आल्याने  त्यांना जाग आली. चोर आल्याचे समजून ते शिडी लावून घराच्या वर चढले. तेथे एक व्यक्ती उभा होता. त्याला घरमालकाने विचारले की, इतक्या रात्री तू इथे काय करतोस?  

त्यावेळी हातबाह्या सावरत तो व्यक्ती घरमालकाला म्हणाला, तू माझी बायको पळवून आणली आहे. मी तुला जिवंत सोडणार नाही. तसेच, शिवीगाळ करू लागला.  त्यावेळी संबधित व्यक्ती दारुच्या नशेत होती. त्याने शिवीगाळ करून सुरीने घरमालकाच्या उजव्या पायाच्या मांडीवर वार केले. त्यांनंतर त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या नागरिकांना जाग आली. त्यांनी दोघांचे भांडणे सोडविले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणी पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र हिले हे करत आहेत.  दरम्यान, संबंधित व्यक्तीची पत्नी सहा महिन्यापासून बेपत्ता आहे. त्यांचा कळंब येथील घरमालकावर संशय आहे. भांडण झाल्यानंतर त्या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केले आहे. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com