पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून एकाने तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता कोथरुडमधील शास्त्रीनगर परिसरात घडली. 

ऋषिकेश जीवराज कामठे (वय 31, रा.जळकी वस्ती, कोथरुड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सोन्या उर्फ दिनानाथ गोरक्षनाथ पवार (वय 19, रा.शास्त्रीनगर, कोथरुड) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या आई-वडीलांसमवेत आशिष गार्डन चौकाकडून साई सयाजी चौकातून शास्त्रीनगरच्या दिशेने जात होते. त्यावेळी आरोपी त्यांच्यासमोर आला. त्याने जुन्या भांडणाचा राग काढत आणि त्याचे घर फिर्यादीनेच जाळल्याचा आरोप करत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यास जिवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन फिर्यादीच्या डोक्यात घाव घातले. त्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले.

Web Title: attack on young boy with Sharp weapons