जुन्या भांडणातून तरुणावर खुनी हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात दोघांनी एकाच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याप्रकरणी विकास गोविंद कांबळे (वय 18, रा. लोहियानगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विकास दिलीप मांढरे (वय 30, रा. लोहियानगर), साहिल नासिर सय्यद (वय 19, रा. पीएमसी कॉलनी) या दोघांना अटक केली. तर अजिंक्‍य शिंदे, दत्ता चव्हाण, प्रसाद शिंदे, केदार शिंदे, मंदार खंडागळे, केदार खंडागळे, बाबा कसबे, अमित ऊर्फ अंबई वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मांढरे व सय्यद या दोघांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले. त्या वेळी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. 

फिर्यादी कांबळे व त्याचे मित्र करण पवार, यश लोंढे, राहुल खवळे व आरोपी अजिंक्‍य शिंदे यांचे जुने भांडण आहे. 26 मे रोजी कांबळे हा त्याच्या मित्रांसमवेत सारसबाग येथील स्टॉलवर पावभाजी खात होता. त्या वेळी आरोपी तेथे लोखंडी वस्तू, कोयता, तलवारी, गज घेऊन आले. त्या वेळी कांबळे याचे मित्र तेथून पळाले. कांबळे हाही पळत असताना शिंदे याने हत्याराने त्याच्यावर वार केले. 

Web Title: attack on youth in pune

टॅग्स