Video : पुण्यात अभविप कार्यालयाच्या नामफलकाला फासले काळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

दिल्लीतील जेएनयुमधील विद्यार्थी व प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचे संपूर्ण राज्यसह पुण्यात पडसाद उमटले होते. नाशिक येथे अभाविप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकमेकांशी भिडले तर, आज अभाविपच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटजवळ असणाऱ्या सुविधा अपार्टमेंटमधील कार्यालयाच्या फलकाला काळे फासण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला.

पुणे : दिल्लीत जेएनयुमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद आजही पुण्यात उमटले. सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यलयाच्या नामफलकाला काळे फासल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करत अभविपचे महामंत्री अनिल ठोंबरे यांनी याचा निषेध व्यक्त केला. विश्रामबाग पोलिसांना खबर मिळाल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिल्लीतील जेएनयुमधील विद्यार्थी व प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचे संपूर्ण राज्यसह पुण्यात पडसाद उमटले होते. नाशिक येथे अभाविप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकमेकांशी भिडले तर, आज अभाविपच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटजवळ असणाऱ्या सुविधा अपार्टमेंटमधील कार्यालयाच्या फलकाला काळे फासण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image

पुणे न्यायालयाचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात समन्स, कारण

दरम्यान, हा प्रकार करणाऱ्याचा शोध घेतला जात असल्याचे विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सांगितले. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतलेले नसले तरी छायाचित्रांमध्ये राष्ट्रवादीचे झेंडे दिसत आहेत. त्यामुळे अभविपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करत या घटनेचा निषेध केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attacked on abvp office blackened their board in Pune