'तुझं लग्न जमू देणार नाही, तू जिवंत असेपर्यंत तुला त्रासच देणार'

girl violence.jpg
girl violence.jpg

पुणे : लग्नास नकार दिला म्हणून तरुणीचे अपहरण करून तिच्यावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री आठ वाजता मुंढवा येथील उड्डाण पुलाखाली घडला. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (दोघे रा. रामटेकडी) व चंदन चव्हांडके (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी सोनवणे या दोघांचे सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे प्रेमसंबंध तुटले. सोनवणे फिर्यादीस सातत्याने फोन करून त्रास देत होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सात वाजता सोनवणे याने नदीम व चंदन यांच्या मदतीने फिर्यादीस मुंढवा येथे रिक्षामध्ये जबरदस्तीने बसविले. तिला हडपसरमधील रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात नेले. तेथे सोनवणेने फिर्यादीला लग्नाची मागणी घातली. फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यामुळे सोनवणेने फिर्यादीस शिवीगाळ करीत चाकूने फिर्यादीवर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाली. त्यानंतर "तुझे लग्न कुठे जमू देणार नाही. तू जिवंत असेपर्यंत तुला त्रास देत राहीन,' अशा शब्दांत आरोपीने फिर्यादीस व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान, या घटनेबाबत खबर मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फिर्यादीस रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए. जी. गवळी करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com