कोंढवा खुर्द येथे अजय प्रजापती (वय 21, रा.कोंढवा खुर्द) यांचे काकडे वस्तीमध्ये श्रीकृष्ण भेळ आणि फरसाण सेंटर नावाचे दुकान आहे. त्यांच्या ओळखीचे ग्राहक असलेली अल्पवयीन मुले त्यांच्याकडून नेहमी भेळ घेऊन जातात. त्यानुसार एका अल्पवयीन मुलानेही काही दिवसांपुर्वी 20 रुपयांची एक भेळ उधारीवर नेली.
पुणे, अलिकडे कोणाला कशाचा राग येईल आणि तो काय करेल, याचा काही नेम नाही. मित्राने उधारीवर नेलेल्या भेळीचे 20 रुपये देण्याची मागणी केली, त्यावरुन मित्राचे पैसे मला का मागतोस, असे म्हणत अल्पवयीन मुलाने भेळ विक्रेत्यावर थेट कोयत्याने वार करीत त्यास गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यात घडला. विक्रेत्याला 20 रुपये तर मिळाले नाहीच, त्याशिवाय गंभीर दुखापत मात्र सहन करण्याची वेळ आली.
कोंढवा खुर्द येथे अजय प्रजापती (वय 21, रा.कोंढवा खुर्द) यांचे काकडे वस्तीमध्ये श्रीकृष्ण भेळ आणि फरसाण सेंटर नावाचे दुकान आहे. त्यांच्या ओळखीचे ग्राहक असलेली अल्पवयीन मुले त्यांच्याकडून नेहमी भेळ घेऊन जातात. त्यानुसार एका अल्पवयीन मुलानेही काही दिवसांपुर्वी 20 रुपयांची एक भेळ उधारीवर नेली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दोन दिवसांनी शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता त्या अल्पवयीन मुलाचा मित्र भेळच्या दुकानामध्ये वेफर्स आणण्यासाठी गेला. त्यावेळी विक्रेते प्रजापती यांनी त्यास तुझ्या मित्राने उधारीवर भेळ नेली आहे, त्याचे 20 रुपये दे, अशी मागणी दुसऱ्या अल्पवयीन मुलाकडे केली. तेव्हा, त्याने "भेळ मित्राने घेतली, मग माझ्याकडे पैसे का मागतोस' अशी प्रजापतीला विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर चिडलेल्या अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारासह प्रजापती यांना शिवीगाळ करीत, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत प्रजापती यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वराज्य पाटील करीत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा