पीएफच्या मागणीसाठी त्याने रोखली बंदुक

मिलिंद संगई
बुधवार, 11 जुलै 2018

बारामती शहर - काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा प्रत्यय बारामतीतील अजिंक्य बिग बझारचे मालक अविनाश राजकुमार गांधी यांना काल आला. त्यांनी अक्षरशः डोळ्यासमोर मृत्यू पाहिला पण नशीब बलवत्तर असल्याने किरकोळ जखमांवरच निभावले. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे परत का देत नाही या कारणासाठी विराज बाळकृष्ण अटक (वय 28, रा. मुंजवडी, ता. फलटण) हा युवक मंगळवारी अजिंक्य बिग बझारमध्ये घुसला. काऊंटरवर बसलेल्या अविनाश गांधी यांच्यावर त्याने पिस्तूल रोखले व पैशांची मागणी केली.

बारामती शहर - काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा प्रत्यय बारामतीतील अजिंक्य बिग बझारचे मालक अविनाश राजकुमार गांधी यांना काल आला. त्यांनी अक्षरशः डोळ्यासमोर मृत्यू पाहिला पण नशीब बलवत्तर असल्याने किरकोळ जखमांवरच निभावले. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे परत का देत नाही या कारणासाठी विराज बाळकृष्ण अटक (वय 28, रा. मुंजवडी, ता. फलटण) हा युवक मंगळवारी अजिंक्य बिग बझारमध्ये घुसला. काऊंटरवर बसलेल्या अविनाश गांधी यांच्यावर त्याने पिस्तूल रोखले व पैशांची मागणी केली. काही क्षण तर अविनाश गांधी यांना काहीच समजत नव्हते, मात्र त्यांनी खुर्चीवरुन उठण्याचा प्रयत्न करताच त्याने छर्रे असलेल्या पिस्तूलातुन बार काढला, ते छर्रे गांधी यांच्या छातीवर लागले. वेदनेने त्यांनी खुर्चीशेजारील खांबाच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अटक याने खिशातील छर्रे पुन्हा पिस्तूलात भरुन दुस-यांदा गांधी यांच्यावर छर्रे झाडले ते त्यांच्या नाकाला लागले. 

हा सगळा थरार सुरु असताना बंदूकीच्या धाकावर अटक याने दुकानातील कोणालाच गांधी यांच्या मदतीला येऊ दिले नाही. मात्र हे नाट्य घडताना गांधी यांनी पोलिस कर्मचारी अविनाश दराडे व फौजदार सुभाष मुंडे यांना या घटनेची कल्पना दिली. त्यांनीही तातडीने अजिंक्य बिग बझारच्या दिशेने धाव घेतली. मला पैसे हवेत मला बाकी काही माहिती नाही अशी धमकी अटक हा पिस्तूल दाखवून करत होता. 

दरम्यान गांधी यांचा मुलगा अजिंक्य दुकानात येताना त्याने अटक याला दुकानाबाहेरच पकडले, त्याच्या डोक्यात शेजारील गॅसची शेगडी घालण्याचा प्रयत्न अटक याने केला, मात्र तो अयशस्वी झाला. तितक्यात दराडे व मुंडे यांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतला. या घटनेचा सर्व थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. 

पोलिसांची तत्परता प्रशंसनीय..
गांधी यांच्या फोननंतर अक्षरशः तीन ते चार मिनिटातच अविनाश दराडे व सुभाष मुंडे घटनास्थळी पोहोचल्याने अटक याला पिस्तूलासह ताब्यात घेण्यात यश मिळाले. पोलिस धावून आल्याने गांधी यांच्याही जिवात जीव आला होता.

Web Title: Attempt to rob in Baramati