
Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
घोरपडी : एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परंतु या वेळी मुलीने धाडस दाखवत स्वतःची सुखरुप सुटका करुन घेतली.
ही घटना सोमवारी (ता. ५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घोरपडी परिसरात घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी समीर शेख (रा. घोरपडी), कार्तिक आणि मुचा यांच्याविरुध्द विनयभंग, अत्याचाराचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही मोबाईल पाहत उभी होती. त्यावेळी तिघे आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी तिचा मोबाईल हिसकावून शारीरिक संबंधाची मागणी केली. अन्यथा मोबाईल तुला परत मिळणार नाही, असे म्हणत तिला मारहाण केली.
त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने आरोपींच्या तावडीतून धाडसाने स्वत:ची कशीबशी सुटका करुन तेथून पळून काढला. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना घोरपडी परिसरातून अटक केली.