धार्मिक तेढ निर्माण करून हिंसाचाराचा प्रयत्न - योगेंद्र यादव

Yogendra-Yadav
Yogendra-Yadav

पुणे - ‘समाजात धार्मिक तेढ निर्माण करून हिंसाचार करणे, हाच देशद्रोह आहे. असेच नेते ‘टुकडे-टुकडे गॅंग’चे प्रमुख आहेत,’’ अशा शब्दांत स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख व राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोमवारी टीका केली.

कोंढवा परिसरात ‘प्रति शाहीनबाग’ आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी यादव पुण्यात आले होते. या निमित्ताने ‘हम भारत के लोग मंच’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘सीएए’, ‘एनआरसी’ आणि ‘एनपीआर’ या विरोधात येत्या शनिवारपासून (ता. २२) ते २३ मार्च या दरम्यान ‘भारत जोडो अभियान’ राबविण्यात येणार आहे, याची घोषणाही यादव यांनी येथे केली.

‘सीएए’चा मुख्य उद्देश हा, शेजारच्या देशातील अत्याचारग्रस्त धार्मिक अल्पसंख्याकांना आश्रय देणे, असा असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या कायद्याच्या मसुद्यात शेजारचे देश, धार्मिक अल्पसंख्याक, अत्याचारग्रस्त आणि आश्रय असे कोणतेही शब्द नाहीत. त्यामुळे हत्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे टीका त्यांनी केली. 

‘श्रीलंकेतील तमीळ हिंदूंना, नेपाळच्या तराई भागातील हिंदूंना नागरिकत्व का मिळाले नाही,’’ असा सवाल त्यांनी केला. दिल्लीमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे शाहीनबाग आंदोलन सुरू केले आहे. त्याच्या समर्थनासाठी देशभरात ११६ ठिकाणी शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांकडे सरकारने लक्ष दिलेले नाही, ही शोकांतिका असल्याचे यादव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com