तंत्रज्ञानाच्या वापराने वाढली हजेरी

संतोष शाळिग्राम
मंगळवार, 3 जानेवारी 2017

शाळा मराठी माध्यमाची. पण तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि विद्यार्थ्यांनाही शिस्त लागावी, तो शाळेत आला, याचा संदेशही पालकांना मिळावी, या हेतूने पुण्यातील पेरुगेट भावे हायस्कूलने प्रयत्न सुरू केला. मराठी शाळांना वस्तुपाठ देत विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी या शाळेने सुरू केली आहे. आता विद्यार्थ्यांची हजेरी ९५ टक्‍क्‍यांपर्यंत तर गेलीच; पण आपला पाल्य शाळेतच असल्याची खात्रीदेखील पालकांना ‘एसएमएस’ने मिळू लागली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी पालकांकडून कोणतेही जादा शुल्क घेतला जात नाही. या उपक्रमाबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक के. एन. अरनाळे सांगतात, ‘‘भावे हायस्कूल शहरात आहे.

शाळा मराठी माध्यमाची. पण तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि विद्यार्थ्यांनाही शिस्त लागावी, तो शाळेत आला, याचा संदेशही पालकांना मिळावी, या हेतूने पुण्यातील पेरुगेट भावे हायस्कूलने प्रयत्न सुरू केला. मराठी शाळांना वस्तुपाठ देत विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी या शाळेने सुरू केली आहे. आता विद्यार्थ्यांची हजेरी ९५ टक्‍क्‍यांपर्यंत तर गेलीच; पण आपला पाल्य शाळेतच असल्याची खात्रीदेखील पालकांना ‘एसएमएस’ने मिळू लागली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी पालकांकडून कोणतेही जादा शुल्क घेतला जात नाही. या उपक्रमाबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक के. एन. अरनाळे सांगतात, ‘‘भावे हायस्कूल शहरात आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करणारे आहेत. ते मुलांना शाळेत सोडून जातात. पण काही मुले शाळा बुडवून बाहेर फिरत असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यावर कोणती उपाययोजना करावी, याचा विचार करताना बायोमेट्रिक हजेरीचा पर्याय समोर आला. त्याला जोडून आम्ही पालकांना एसएमएस पाठविण्याची सोय केली. आता मुलांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविल्यानंतर पालकांना आपोआप संदेश जातो. हा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली खासगी मराठी शाळा आहे. यामुळे विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थितीत वीस टक्‍क्‍यांनी वाढली आहे. पालकांनादेखील पाल्य शाळेतच असल्याची खात्री पटू लागली आहे. मुलगा शाळेत नाही, असे वर्गशिक्षकांचे दूरध्वनी बंद झाल्याची प्रतिक्रिया पालक देऊ लागले आहेत.’’

तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर शाळांतील हजेरीची समस्याही सोडवता येऊ शकते, हे यातून सिद्ध झाले आहे. मुलांना शिस्त लावण्याबरोबर मराठी शाळा तंत्रज्ञानाचाही वापर करू लागल्याचा संदेशही इतर शाळांना या निमित्ताने गेला आहे. याच शाळेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी देखील चांगला प्रयत्न केला आहे. एका वर्गात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची पुस्तके शाळा ठेवून घेतले आणि त्या वर्गात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातात. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मिळणारा पुस्तकांचा नवा संच घरीच ठेवला जातो. परिणामी, विद्यार्थ्यांना दप्तरातील ओझे अगदी कमी वाटू लागते. सर्वच शाळांना हा उपक्रम राबविता येण्यासारखाच आहे.

Web Title: Attendance increased use of technology