अवसरी बुद्रुक निवडणुक याचिकेच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

सुदाम बिडकर
रविवार, 6 मे 2018

आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने करण्यात आली असुन गावातील अनुसुचित जमातीची लोकसंख्या जास्त दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात ती खुप कमी आहे त्यामुळे प्रभाग रचना रद्द करुन पुन्हा नव्याने जातीनिहाय सर्वेक्षण करुन नविन प्रभाग रचना करावी याबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवार (दि. 7) रोजी सुनावणी होणार आहे.

पारगाव, (पुणे) - आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने करण्यात आली असुन गावातील अनुसुचित जमातीची लोकसंख्या जास्त दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात ती खुप कमी आहे त्यामुळे प्रभाग रचना रद्द करुन पुन्हा नव्याने जातीनिहाय सर्वेक्षण करुन नविन प्रभाग रचना करावी याबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवार (दि. 7) रोजी सुनावणी होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज स्विकारण्यासही उद्या पासुन सुरवात होत आहे त्यामुळे उच्च न्यायालय कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक 27 मे रोजी होत आहे त्यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. परंतु, ही प्रभाग रचना करतेवेळी काही महसुली विभागाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नाही शिवाय प्रभाग रचनेवेळी नैसर्गिक हद्दीही विचारात घेण्यात आल्या नाहीत त्यामुळे प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने झाल्या आहेत. 

गावातील धनगर समाजातील कुटुंबासमोर भटक्या विमुक्त असा उल्लेख न करता अनुसुचित जमाती असा तर काही इतर मागासप्रवर्गातील कुटुंबासमोरही अनुसुचित जमाती असा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे कागदपत्री अनुसुचित जमातीची लोकसंख्या जास्त दिसत आहे ती प्रत्यक्षात खुपच कमी आहे यासंदर्भात तहसिलदार, प्रांतआधिकारी व जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या कोणत्याही प्रकारचे म्हणणे ऐकुन घेतले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे

प्रभाग रचना पुन्हा करावी जातीनिहाय सर्वेक्षण पुन्हा करण्यात यावे याबाबत जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे व राष्ट्रवादी काँग्रेसचे गौतम रोकडे, माजी सरपंच बी.एन. हिंगे, सचिन शांताराम हिंगे, यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर यापुर्वी यासंदर्भातच वसंतराव हिंगे व शिवाजी हिंगे यांनी जिल्हाधिकार्यांकडेही अर्ज केला आहे. उच्च न्यायालयातील याचिकेवर सोमवार दि. 7 रोजी सुनावणी होणार आहे व निवडणुकीसाठी अर्ज स्विकारण्यासही उद्या पासुन सुरवात होत आहे त्यामुळे उच्च न्यायालय कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: The attention of everyone in the hearing PIL of awasari budruk election