पुणे : नगरसेवक अतुल गायकवाड यांची राजीनाम्यातून माघार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भाजपने उमेदवारी नाकारल्याने तडकाफडकी निर्णय घेऊन नगरसेवक अतुल गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.

कॅन्टोन्मेंट (पुणे) : भाजपने उमेदवारी नाकारल्याने तडकाफडकी निर्णय घेऊन नगरसेवक अतुल गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः राजीनामा दिल्याचे पत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र, यावेळी पक्षश्रेष्ठींनी आपली समजूत काढल्याने राजीनामा माघार घेतल्याचे त्यांनी 'सकाळ'च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

अतुल गायकवाड हे कॅन्टोन्मेंट बोर्डातील वार्ड क्र. 4 चे नगरसेवक असून, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात इच्छुक उमेदवार होते. गेल्या 32 वर्षांपासून ते पक्षात कार्यरत आहे. यावेळी खासदार गिरीश बापट व आमदार माधुरी मिसाळ यांनी त्यांची समजूत काढल्याने अखेर राजीनामा माघार घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. एकाचदिवशी राजीनामा व पुन्हा माघार घेतलेल्या निर्णयामुळे गायकवाड यांच्या विषयी कॅन्टोन्मेंट मतदारसंघात चांगलेच चर्चेला उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Gaikwad canceled his Resignation of BJP Party Member